---Advertisement---

Adavad News : प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांची आचारसंहिता पाळा, अन्यथा…

---Advertisement---

अडावद, ता.चोपडा : प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचे सर्व धर्मीय बाधवांनी पालन करावे. या बाबतीत राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना यापुढे कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रार्थनास्थळांवरील भोंग्याची आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन अडावदचे सपोनि प्रमोद वाघ यांनी केले.

अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवार, २२ रोजी झालेल्या विशेष बैठकीत प्रमोद वाघ यांनी उपस्थित सर्व धर्मीय नागरीकांना सुचित केले. रात्री १० ते सकाळी ६ वाजे दरम्यान प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपक वाजवीता येणार नाही. या बाबतचा निर्णय उच्च न्यायालयाने या आधीच घेतलेला आहे. परंतु सदर नियमाकडे डोळेझाक करुन भोंग्याबाबतची कुठलीही आचारसंहिता पाळली जात नाही असेही निदर्शनास आले होते. त्याच प्रमाणे मूळ हेतूंचे व वेळेचे कुठलेही बंधन न पाळता बऱ्याच वेळापर्यंत प्रार्थनास्थळांवरील भोंगे सुरुच राहत होते. तसेच ५५ डिसीबल पर्यंत आवाजाची मर्यादा उच्च न्यायालयाने ठरवून दिल्यानंतरही मोठ्या कर्णकर्कश आवाजात भोंगे सुरू राहत असल्याचे निदर्शनास आले होते. जमिनीपासून फक्त ८ फुट उंचीवर भोंगे बांधण्याचे स्पष्ट निर्देश असतांना अतिउंचावर हे भोंगे बांधले जात होते. या सर्व बाबींचा सारासार विचार करुन शासनाने भोंग्यांबाबत कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे सर्वांनी न्यायालयाच्या या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन सपोनि प्रमोद वाघ यांनी केले.

याप्रसंगी नागरिकांनी आपलल्या प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक बाबत काही शंका उपस्थित केल्या. व याबाबत सखोल माहिती जाणून घेतली. तसेच सदर बाबत रितसर परवानगीची विचारणा पोलीस सुत्रांना केली. यावेळी पोउनि राजु थोरात, शेषराव तोरे व परिसरातील सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment