अ‍ॅपल आयफोन ‘१५’ लाँच होणार, कधी?

तरुण भारत लाईव्ह । ३० ऑगस्ट २०२३। अ‍ॅपलच्या आयफोन १५ सीरीजची सगळेच वाट पहात आहेत.  अ‍ॅपल आयफोन १५ हा लवकरच लाँच होईल. कॅलिफोर्नियातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने नवा आयफोन लॉन्च होण्याच्या तयारीत असल्याची घोषणा केली आहे.  अ‍ॅपल आयफोन १५ सोबतच इतर अनेक उत्पादने लॉन्च करेल.

अ‍ॅपलचा ‘Wanderlust’ इव्हेंट 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाईल. या इव्हेन्ट मध्ये अ‍ॅपल आयफोन १५, अ‍ॅपल वॉच ९,अ‍ॅपल वॉच अल्ट्रा २ यांचा समावेश असेल. याचे वैशिट्य असे आहे कि यामध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट हा असेल. त्याच्या मदतीने वापरकर्ते आयफोन वेगाने चार्ज करू शकतील. iPhone 15 MagSafe ॲक्सेसरीजला सपोर्ट करेल. ॲपलच्या मॅगसेफ चार्जरची किंमत 16 डॉलर्स म्हणजेच १३०० रुपये असू शकते. अ‍ॅपल आयफोन १५ याची किंमत $899 किंवा भारतात 89,900 रुपये असू शकते.

याशिवाय या इव्हेंटमध्ये iOS 17 आणि WatchOS हे लाँच केले जाऊ शकतात. पण अ‍ॅपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लॉन्च केले जातील याबद्दलची कोणतीच माहिती कंपनीने दिलेली नाही. हा इव्हेन्ट १२ सप्टेंबर ला अ‍ॅपल पार्क ला रात्री १०.३० वाजता सुरु होणार असून हा इव्हेंट Apple.com आणि Apple TV अ‍ॅपवर थेट ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.