तरुण भारत लाईव्ह । ५ मे २०२३। ‘रबडी’ उत्तर भारतातील लोकप्रिय गोड पदार्थ. हा चविष्ट पदार्थ सणसमारंभांव्यतिरिक्त अन्य दिवशीही तयार करून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून देखील ह्या पदार्थाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. अॅपल रबडी ही डिश सफरचंद, दूध, साखर, दालचिनी पावडर, काजू आणि बदाम या सामग्रींचा वापर करून तयार केली जाते. अॅपल रबडी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
७५० मिली फुल क्रीम मिल्क, आवश्यकतेनुसार साखर, आवश्यकतेनुसार बदाम, आवश्यकतेनुसार हिरवी वेलची, १ मोठ्या आकाराचे सफरचंद.
कृती
सर्वप्रथम, सफरचंदाची साल काढा आणि किसून घ्या. किसलेले सफरचंद बाजूला ठेवून द्यावे. यानंतर एका पॅनमध्ये दूध गरम करत ठेवा. दूध घट्ट होईपर्यंत गरम होऊ द्यावे. दूध घट्ट झाल्यानंतर त्यात किसलेले सफरचंद मिक्स करा. तीन ते चार मिनिटांनंतर त्यात साखर मिक्सर करा. दूध ढवळत राहा. यानंतर वेलची पावडर, दोन ते तीन बदामाचे कापलेले काप मिक्स करा आणि अॅपल रबडी शिजू द्यावी. अॅपल रबडी गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंड करूनही तुम्ही सर्व्ह करू शकता.