तरुण भारत लाईव्ह । पुणे : राज्य मंडळातर्फे (10th Supplementary Exam) दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 7 ते 16 जून दरम्यान नियमित शुल्कासह, तर 17 ते 21 जून या दरम्यान विलंब शुल्कासह शाळांमार्फत भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी 7 ते 21 जून या कालावधीत अर्ज भरत असतानाच 8 ते 22 जून या कालावधीत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरता येणार आहे. 23 जूनला (10th Supplementary Exam) माध्यमिक शाळांना बँकेत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळात जमा करायची आहे.