---Advertisement---

पहिलं लग्न करताय ? मग ‘या’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या कोण आहे पात्र ?

---Advertisement---

धुळे : अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जोडप्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने ‘कन्यादान योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संजय सैदाणे यांनी केले आहे.

योजनेत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांपैकी वधूच्या पालकांना २० हजार रुपये अर्थसहाय तर आयोजक स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यासाठी ४ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान विवाहाच्या दिवशी धनादेशाद्वारे देण्यात येते. या योजनेच्या पात्रतेच्या निकषांप्रमाणे वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे. वधूचे वय किमान १८ वर्षे व वराचे वय २१ वर्षे असावे. किमान १० जोडपी असलेला सामूहिक विवाह सोहळा योजनेकरिता ग्राह्य धरला जातो.

विवाहाच्या ३० दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठविणे गरजेचे

विवाहाच्या आधी ३० दिवसांपूर्वी प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण, धुळे यांच्याकडे सादर करावा. विवाह सोहळ्याचे आयोजन स्वयंसेवी संस्था, शासकीय अथवा अर्थशासकीय प्राधिकरण, जिल्हा परिषद यांना करता येईल. योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या संस्थांनी, सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा. परिशिष्ट अ, ब, क आणि ड या आवश्यक नमुन्यांचे अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असेही आवाहनही सैदाणे यांनी केले आहे.

प्रथम विवाहासाठी लाभ

योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी लागू; मात्र विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठीही मान्यता. आयोजक संस्था ही धर्मादाय आयुक्तांजवळ नोंदणीकृत असावी व तिच्यावर कोणताही गुन्हा नोंदवलेला नसावा, प्रत्येक जोडप्याचा प्रथम विवाह असल्याचे गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक किंवा नगरसेवक / मुख्याधिकारी यांच्या दोन प्रमाणपत्राद्वारे सिद्ध करणे आवश्यक आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment