---Advertisement---

बापरे ! अमळनेर नगर परिषदेच्या फायर विभागात अपात्र कर्मचाऱ्यांची नेमणूक ?

---Advertisement---

अमळनेर : अमळनेर नगर परिषदेच्या फायर विभागातील काही कर्मचारी पूर्णपणे अशिक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते परेश उदेवल यांनी न. पा. चे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून, त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरात आगीच्या घटना वाढत असताना फायर विभागात प्रशिक्षित आणि पात्र कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र येथे जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा प्रशिक्षण नाही. दरम्यान, सहा दिवसात कार्यवाही न झाल्यास विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नागरीकांमध्ये चिंता

यासंदर्भात नगर परिषदेच्या संबंधित विभागाचे उत्तर अद्याप आलेले नाही. मात्र हा प्रकार समोर आल्याने नागरीकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

असे करणार आंदोलन

काचेसमोर काळी फित लावून निषेध, घंटानाद आंदोलन, निवेदनाच्या प्रतींचे प्रतीकात्मक दहन, ढोल वाजवत कार्यालयासमोर निदर्शन,  नगरपरिषद ते स्मशानभूमी मूक पदयात्रा, शहरात डिजिटल बॅनर लावून जनजागृती, कार्यालयाबाहेर झेंडा लावून ठिय्या आंदोल करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---