‘या’ आठवड्यात कुंभ रास असणाऱ्या व्यक्तींना जोडीदाराचं सहकार्य मिळेल, जाणून घ्या तुमची रास काय सांगते?

तरुण भारत लाईव्ह । २२ जानेवारी २०२३। 

मेष रास
या आठवड्यात आपल्याकडून काही धडाडीची कामे पूर्ण होऊ शकतील. विशेषतः कार्यक्षेत्रात आपल्या कामांची चुणूक दिसून येईल. काही धाडसाची पावले आपण या आठवड्यात उचलाल. त्याचे दीर्घकाळ उत्तम लाभ आपणास प्राप्त होत रहातील. कुटुंबातूनही आपल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवासाच्या योजना संभवतात. काही मंगलकार्याची आखणी होईल.आजूबाजूला आनंद आणि समाधानाचं वातावरण राहील. विद्यार्थीवर्गाला हा आठवडा उत्साहवर्धक राहील.

वृषभ रास
या आठवड्यात आपली आर्थिक घडी मजबूत होताना दिसेल. विशेषतः व्यवसायात असलेल्या व्यक्तींची आवक वाढेल. जुनी येणी येऊ लागतील. काही अचानक निर्णयामुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल. तसेच काही आकस्मिक लाभ होऊ शकेल. तसेच काही आकस्मिक घटनांची नोंद करता येऊ शकेल. कुटुंबात काही मोठ्या खरेदीचे विचार साकार होऊ शकतात. प्रवासाच्या योजना ठरतील. दरम्यान काही किरकोळ घटना मनाचा हिरमोड करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी समाधानकारक काळ.

मिथुन रास
या आठवड्यातील ग्रहमान पाहता आतापर्यंत काहीसा विस्कळीत ठरलेला काळ जरा सुगठीत होऊन आपल्याला कार्यक्षेत्रात महत्व प्राप्त व्हावे. नोकरी व्यवसायात व्यग्रता वाढेल. काही जबाबदारीची कामे आपल्याला आवर्जून दिली जाऊ शकतात. स्वतः चे महत्व वाढवून घेण्यासाठी हे लाभकारकच ठरेल. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. दरम्यान, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष कदापि होऊ देऊ नये. पथ्ये संभाळावीत. विद्यार्थीवर्गास उत्तम काळ.

कर्क रास
या आठवड्याची सुरवात एखाद्या आनंददायक घटनेने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी खरेदी होऊ शकते. मात्र कुणाला उधार उसनवारी देण्याचा प्रसंग आल्यास सावध निर्णय घ्यायला हवा. गुंतवणूक टाळावी हा आठवडा तसा विविध समारंभात सहभाग, भ्रमंती यामुळे उत्साहात पार पडू शकतो. नोकरी व्यवसायात सहकार्यांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासूनही सावध असावे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत आवश्यक.

सिंह रास
या आठवड्यात आपल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांना उत्तम बळ मिळताना दिसेल. नोकरी व्यवसायातील कामाचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आपल्या संततीस देखील या आठवड्यात शिक्षण, नोकरी संबंधाने काही लक्षणीय यश लाभू शकेल.यशाची कमान उंचावेल तथापि मनावर सायं ठेवायला हवा.नव्या योजना पुरेशी खबरदारी घेऊन सुरू करावयास हरकत नाही.गुंतवणूक टाळावी. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. विद्यार्थीवर्गास आठवडा उत्तम ठरावा.

कन्या रास
या आठवड्यात आपल्या व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी काही महत्वपूर्ण घडामोडी संभवतात. काही अपेक्षित बदल आनंददायक ठरावेत जबाबदारीने सोपवलेले काम पूर्ण करून दाखवाल. आपली आर्थिक आवक देखील वाढेल. काही युवकांना व्यवसायिक वाटचाल सुरु करण्यास उत्तम संधी मिळेल. विवाह कार्याच्या दृष्टीने योग्य चालून येतील. मात्र या साऱ्यात प्रलोभनांच्या मागे धावू नका असे मुद्दाम सुचवावेसे वाटते. कुटुंबात समाधान राहील. विद्यार्थीवर्गाला उपयुक्त काळ.

तूळ रास
हा आठवडा आपणास व कुटुंबास प्रामुख्याने आनंदमय व कामात यश प्रदान करणारा राहील. छोट्या छोट्या कामातूनही आपला उत्साह व समाधान दृष्टिगोचर होत रहातील. कार्यक्षेत्रात मात्र सहकाऱ्यांशी गोड बोलून काम काढून घ्यावे लागेल. मित्र परिवार व भाऊबंदकीत काही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. युवा वर्गास चांगल्या संधी लाभू शकतील. विवाह कार्यासाठी चांगले योग प्रवासाचे योग्य संभवतात. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे.

वृश्चिक रास
हा आठवडा आपणास काहीसा कष्टप्रद व मनाविरुद्ध घटनांनी युक्त ठरू शकतो. या काळात प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे. कार्यालयीन हितशत्रूच्या कारवायांमुळे निर्माण झालेली बोच देखील जाणवणार. हे सारे पाहता क्षमतेपेक्षा मोठी उडी मारू नका. जोखीम पत्करणे धोक्याचे राहील. सावध पवित्र असावा.कार्यक्षेत्रातील वातावरण जरा युक्तीनेच संभाळावे. खर्चावर नियंत्रण हवे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील.

धनु रास
हा आठवडा आपणास आर्थिक लाभाचा व महत्व वाढीस लावणारा ठरू शकतो. जोडीदाराकडून तसेच व्यवसायिक भागीदाराकडून उत्तम प्रतिसाद हे या आठवड्याचे मुख्य फलित ठरावे. आपल्या योजनांना बळ मिळेल. काही धाडसी निर्णय घेण्यास हरकत नाही. त्वरित लाभ दिसला नाही तरी त्याची उत्तम फळे सावकाश हाती येतील. युवावर्गास कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. आकस्मिक खर्चानादेखील तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबातून सहकार्य मिळेल विद्यार्थाना परीक्षेत उत्तम यश मिळेल.

मकर रास
हा आठवडा आपणास व्यावसायिक लाभासाठी उत्तम राहील. आपला अर्थत्रिकोण सक्रिय होत असल्याने नोकरी व्यवसायात चांगले यश मिळावे. नोकरीसाठी युवावर्गास उपयुक्त संधी लाभू शकतील. प्रकृती चांगली राहील. कुटुंबातून तसेच कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळावी. कुटुंबात काही खरेदीचे योग  आहेत. मात्र स्वभावात मृदुपणा आणावा लागेल.कटू बोलून श्रेय गमावू नका. विद्यार्थीवर्गास उत्तम योग.

कुंभ रास
हा आठवडा आपणास सर्वतोपरी उत्तम जावा अगोदर केलेल्या एखाद्या महत्वपूर्ण कार्याचा लाभ या आठवड्यात मिळू शकतो. आर्थिक फायदा ही मिळणार आहेत. मुलांकडून अपेक्षित बातम्या कळू शकतात. त्यांचे यश निश्चितपणे सुखावून जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवासाच्या योजना आखल्या जातील. शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांच्या योजनांना दिशा मिळेल. कलाक्षेत्रातील मंडळींना आठवडा उत्तम जावा. विद्यार्थीवर्गाला परीक्षेत मोठे यश मिळवता येईल.

मीन रास   

हा आठवडा आपणास व्यवसायात मंदीचे वातावरण जाणवेल. नोकरीत काहीसा तणाव वाढेल. अधिकारवर्गाशी आपल्याला जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबातून मात्र आपणास उत्तम साथ मिळेल. पेच निर्माण झाल्यास वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. सावधगिरी म्हणून नवीन कोणताही उपक्रम तूर्त सुरु करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. वाहने सांभाळून चालवावीत. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.