---Advertisement---
Archana Tiwari Missing Case : एलएलबीचे शिक्षण घेणारी अर्चना तिवारी गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत असून, पोलिसांनी तपासाला गती द्यावी, अशी आर्त हाक सध्या तिवारी कुटुंबीय देत आहेत. अर्चना रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वेने घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र अद्याप ती घरी पोहोचलीच नाही.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे अर्चना तिवारी (वय २८) ही तरुणी एलएलबीचे शिक्षण घेत होती. दरम्यान, ती रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या गावी कटनी येथे जाण्यासाठी इंदूरहुन रेल्वेने निघाली होती. मात्र, ती घरी पोहोचलीच नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेला तब्बल १५ दिवस उलटले असून, तिचा शोध घेण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.
दरम्यान, अर्चनाचे नाव कॉन्स्टेबल राम तोमरशी जोडले जात असून, त्याने अर्चनाचे ट्रेन तिकीटही बुक केले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यानुसार ग्वाल्हेर पोलिसांनी कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनुसार, सुरुवातीच्या चौकशीत राम तोमरने कबूल केले आहे की तो अर्चनाच्या संपर्कात होता. दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संपर्कात आले होते. मात्र हा सूत्रांचा दावा असून, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे अर्चना तिवारीसोबत नेमकं झालं ? हे पोलीस तपासानंतरच समोर येईल.
तपासाचा वेग वाढवा
अर्चना, गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे अर्चनाचे कुटुंबीय चिंतेत असून, पोलिसांनी तपासाला गती द्यावी, अशी आर्त हाक सध्या तिवारी कुटुंबीय देत आहेत.