तरुण भारत लाईव्ह । २५ जानेवारी २०२३। वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. दुसरीकडे, तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर दिशेला शुभ मानला जातो. अशाप्रकारे वास्तूनुसार घरातील खोल्या, हॉल, किचन, बाथरूम आणि शयनकक्ष एका विशिष्ट दिशेला असावेत. त्यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात. काही महत्वाच्या वस्तू टिप्स जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते. घरात कधीही झाडूला उभे ठेवू नये, तसेच झाडूला पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी, आणि झाडू ओलांडू नये, नाहीतर घरातील बरकत कमी होते. जेवण अंथरुणावर बसून करून नये. अन्यथा लक्ष्मी घरात येत नाही. स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीला द्यावी. याने देवता प्रसन्न होतात आणि पितरांना शांती मिळते. देवपूजा सकाळी 6 ते 8च्या दरम्यान केली पाहिजे व पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. देवघरात नेहमी पाण्याचा कलश भरून ठेवावा. घरात कधीही जाळे लागू देऊ नये, नाहीतर भाग्य आणि कर्मावर देखील जाळे लागू लागतात आणि अडचणींना तोंड द्यावे लागते.
वास्तुशास्त्रात दिशा खूप महत्वाची आहे कारण प्रत्येक दिशेचा स्वतःचा स्वामी असतो. दिशा लक्षात न ठेवता घराची रचना केली तर या घरामध्ये वास्तुदोष असण्याची शक्यता असते. त्यामुळे इमारतीची रचना करताना आणि घरातील वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पूर्व हि घरासाठी सर्वात सकारात्मक आणि महत्वाची दिशा आहे. पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे. या दिशने येणारे सकाळचे सूर्यकिरण घरात सकाळी प्रसन्नता आणते ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही. घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी घरातील फरश्या या मिठाच्या पाण्याने पुसाव्या.