तरुण भारत लाईव्ह । २० मार्च २०२३ । कोलंबियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबियात लष्करी जवानांचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या भीषण अपघातात चार जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लष्करी हेलिकॉप्टर पुरवठा ऑपरेशन करत होते. मात्र, उंचावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते खाली कोसळले. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी ते नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून आले. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि दोन क्रू मेंबर्स होते. यातील दोन जणांनी हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी उड्या मारल्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, कोलंबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.