---Advertisement---

आता एक थेंबही पाणी पाकिस्तानला जाणार नाही; शहा-पाटील यांचा बैठकीनंतर निर्णय

---Advertisement---

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री सीआर पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे.

सीआर पाटील म्हणाले की, सिंधू पाणी कराराबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यात लागू केला जाईल. तात्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. अर्थात एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये यासाठी व्यवस्था केली जाईल.

सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर, शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापर याबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री, जलशक्ती मंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवले जाईल. त्याचा परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल. पाणी थांबवल्यानंतर धरणांची क्षमता वाढवली जाईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून जास्त पाणी साठवता येईल. यासाठी धरणांमधील गाळ काढला जाईल. धरणांचे फ्लशिंग देखील केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

आता मातीत गाडण्याची वेळ आलीय; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा

बिहार : पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आलीय. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या मालकांचे कंबरडे मोडेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त एका जाहीर सभेला संबोधित केले. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच भाषण होते. यावेळी मोदींनी प्रथम पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि आपले भाषण सुरू केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment