Amalner Crime : अनिल चंडालेला पोलिसांचा दणका; अवैध शस्त्रसाठासह केली अटक

---Advertisement---

 

Amalner Crime : दहशत माजवण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्याला एलसीबी व स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. अनिल मोहन चंडाले, असे अटक संशयिताचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील अनिल मोहन चंडाले हा शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला एलसीबी व स्थानिक पोलिसांनी मध्यरात्री धाडसिक कारवाई करून अटक केली.

ग्रामीण रुग्णालयाजवळ इंदिरा भुवन परिसरात पोलिसांनी घेराव घालून त्याला पकडले. त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तुल आणि चार काडतुसे असा तब्बल ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

विशेषतः या कारवाईचा धागा यावलच्या युवराज भास्कर याच्यापासून लागला. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व दोन काडतुसे मिळाल्यानंतर चौकशीत उघड झाले की भुसावळचा भूषण सपकाळे आणि पाचोर्‍याचा समाधान निकम यांनी उमर्टी येथून पिस्तुले व काडतुसे आणून विक्री केली होती.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शरद काकळीज, संतोष नागरे व नितीन मनोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अनिल व युवराज यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---