नागपूर : नाना पटोलेंना शिंदेकडून महिन्याला १ खोका दिला जातो. त्याचबरोबर १६ एप्रिलला नाना पटोले हे गुवाहाटीत असतील, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने आशिष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंवर गंभीर आरोप देशमुखांनी केले आहेत.
तसेच काँग्रेसकडून अशिष देशमुख यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई ही अंतिम टप्प्यात आहे.प्रदेश कार्यकारणीने तसा अहवाल केंद्रीय कार्यकारणीकडे पाठवला आहे. त्याचबरोबर माझी वक्तव्ये ही पक्षविरोधी नाहीत. तर मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामासंदर्भात सर्व माहिती मी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांच्या कानावर ३ महिन्यांपूर्वीच घातली. पण ही बाब त्यांनी तक्रारीच्या स्वरुपात घेतली की काय? मला माहिती नाही, असे विधान ही देशमुखांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या सभेवेळी नाना पटोले हे गैरहजर होते. तेव्हा आजारी असल्याचं सांगण्यात आलं. पण त्यानंतर त्यांनी स्वत: ते त्यावेळेस दिल्लीला होते असं स्पष्ट केलं. पण मला मिळालेल्या माहितीनुसार,ते सुरतच्या मार्गावर होते.त्यामुळे आता सुरतला कोण जात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नागपूर सभेआधी प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला असतील, असे ही कॉंग्रेस नेते देशमुख म्हणाले.