---Advertisement---

आधे इथर गए आधे उधर गए, अकेले असरानी.., उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांची खोचक टीका!

---Advertisement---

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खेड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलं. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची तुलना शोले चित्रपटातील असरानींच्या जेलर या व्यक्तिरेखेशी केली आहे. असरानींचा एक संवाद आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यासाठी वापरला आहे.

अकेले असरानी बच गए
आधे इथर गएआधे उधर गए.. अकेले असरानी पच गए.. आता महाराष्ट्रात ‘असरानी’ जिथे जिथे फिरतील, तिथे तुफान मनोरंजन होणार! असा टोला आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.

कोकणात शिमगा असल्याने जनता
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली, तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment