Asoda Railway Flyover : जळगाव येथील आसोदा रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाच्या कामाला गती मिळाली असून पुलाचे आतापर्यंत ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंप्राळा रेल्वे गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलाच्या कामावरील मनुष्यबळ वाढल्याने हा पुल फेब्रुवारी अखेर पर्यंत पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महारेलकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या इगतपुरी भुसावळ विभागावरील जळगाव रेल्वे स्थानक आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) द्वारे बांधकामे वेगात सुरू आहे.
यात आसोदा रेल्वे गेटवरील पुलाचे कामदेखील प्रगतीपथावर असून ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम हे दाट वस्ती व रहदारीमध्ये सुरू असून पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले झोपड्यांचे अतिक्रमण काढण्याचे आवाहन महापालिकेपुढे आहे
पुलाला 33 कोटी रुपयांचा निधी
असोदा रेल्वे गेटवरील पुलाची लांबी सातशे मीटर असून हा पूल दोन लेनमध्ये तयार होत आहे हा पूल 33 कोटी रुपयांच्या निधीतून तयार केला जात आहे सुमारे 80 कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे
पुलावर इंटिग्रेटेड युटीलिटी डक्ट प्रणाली
महा रेल्वे बॅरियर वर नवीन प्रणालीचा शोध लावला आहे जो सार्वजनिक सुरक्षित तरजोड न करता युटीलिटीज तपासणी करणे दुरुस्ती करणे आणि बदल करण्यासाठी सोयीस्कर राहणार आहे यात स्टेलनेस स्टीलचे अत्याधुनिक युटीलिटी डक्ट तयार केले असून यातून सर्व इलेक्ट्रिकल केबल त्यातून जातील सर्व केवळ डक्ट मध्येच राहतील आणि अपघाताचा धोका यामुळे कमी होईल
पुलाचे प्रमुख वैशिष्ट्य
पुलाचे काम दाट रहदारी मध्ये अखंडपणे सुरू आहे .नवीन प्रणालीचा वापर रात्रीच्या चांगल्या दृश्यमानतेसाठी एलईडी, सजावटीसाठी रोलिंग एलईडी, फोर कोट इपॉक्सी पेंटिंग सिस्टीम पुलाचे सौंदर्य वाढवेल . पुलाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते वेग कमी न करता रेल्वेची मुक्त वाहतूक .पुलामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार. वैद्यकीय आणि पाणी तसेच नागरिकांना जलद सेवा मिळणार.
यावल कडे जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग
हा पूल पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहर आणि आसपासच्या नागरिकांना त्रास मुक्त वाहतूक होणार आहे. तसेच असोदा भादली यावल व मध्य प्रदेश मध्ये जाणाऱ्या वाहनधारकांना हा मार्ग सोयीस्कर राहणार आहे.