Assembly E Result 2023 : अजूनही निकाल स्पष्ट नाहीये, काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित?

Assembly Election Result 2023 Live Updates: आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी तेलंगणात काँग्रेसचा विजय होताना दिसत आहे. शिवराज सिंह चौहान यांचे सरकार जबरदस्त निकालांसह मध्यप्रदेशात पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाचही राज्यांच्या निकालावरून काँग्रेस-भाजपच्या विजयाचे भाकित वर्तविले आहे.

काय म्हणाले आहे संजय राऊत?
भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नारा दिला होता, परंतु काँग्रेस पक्ष भाजपला विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर देताना दिसतोय. तेलगंणा सारख्या राज्यात मोदी-शहा आपली जादू दाखवू शकले नाहीत, तिथे राहुल गांधी यांनी पिछाडीवर टाकले आहे.

राजस्थान आणि मध्यप्रदेश येथेही हीच परिस्थिती असेल, असे भाकित संजय राऊत यांनी  वर्तविले आहे. अजूनही निकाल स्पष्ट नाहीये. हा सुरुवातीचा कल आहे. पाच राजाच्या निवडणुका आहेत. यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल.

छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसचं राज्य कायम राहील. मिझोराममध्ये तिकडचे प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे तीन निकाल सोडले तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात खूप मोठी टक्कर होईल, असं संजय राऊत म्हणाले.

तर आता कल, ट्रेन्स समोर येत आहे. हे ट्रेन्स अनेकदा कायम राहतात किंवा राहत नाहीत. आम्ही बिहारला हे पाहिलं आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल, याची आम्हाला खात्री आहे, असं संजय राऊतांनी म्हटले आहे.