वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच पत्र व्हायरल झालय. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे “मूळात ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, निवडून येण्याच सोडा, पण ज्यांना मत मिळण्याचा विश्वास नसतो, ते अशा गोष्टी करतात.
वरळीतील मतदार सूज्ञ आहे. मी असा कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. मतदारांनी यावर विश्वास ठेऊ नये. ही गोष्ट खोटी आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.
२८८ विधानसभेच्या जागांसाठी ७ हजार ०७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
हा आकडा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघांसाठी 3 हजार २३९ उमेदवार रिंगणात उतरले होते.