Assembly Election 2024 । कुणाचं सरकार येणार, महायुती की महाविकास आघाडी ? जाणून घ्या अंदाज

#image_title

Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. त्यामुळे आज दिग्गज नेत्यांच्या अनेक सभा पार पडणार आहेत. मतदानपूर्वीचे ४८ तास अतिशय महत्त्वाचे असून निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार, अंदाज काय आहे ? ते जाणून घेऊया…

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 145 जागांची आवश्यकता आहे. ज्या आघाडीला 145 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील त्यांना राज्यात सरकार स्थापन करता येणार आहे. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत.

शिंदे यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार यांचा पाठिंबा आहे, ज्यांच्या मदतीने ते सरकार चालवत आहेत. यावेळी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही हे निश्चित आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात पुनरागमन करू शकते, असा अंदाज आहे. महायुती आघाडीला 288 पैकी 144-152 जागा मिळू शकतात. मात्र, महाविकास आघाडीही चुरशीची लढत देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोण जिंकेल हे 23 नोव्हेंबर 2024 लाच कळेल.

तत्पूर्वी मैटराइजच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) यांना धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.