Assembly Election 2024 । मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जायचं की नाही, काय म्हणालं उच्च न्यायालय ?

Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा सोमवारी सायंकाळी ६.०० वाजता थांबला. उद्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, मतदान करताना मतदारांनी मोबाईल जवळ बाळगावा की नाही ? याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केला आहे. 

काय म्हणालं उच्च न्यायालय ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी मोबाईल फोन जवळ बाळगावा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचा भारतीय निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मतदारांना त्यांची ओळख दाखवण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर ॲप वापरण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

वकिल उजाला यादव यांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याबाबत याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

मतदान प्रक्रिया सोपी नाही
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने मतदानाची प्रक्रिया सोपी नसल्याचे सांगितले. वकिल उजाला यादव यांनी मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्याबाबत याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.