अजित पवारांच मोठा वक्तव्य! मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले ? वाचा…

Assembly Election 2024 । महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसह नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनीही सकाळी काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिली.

https://x.com/i/status/1859058887749759195

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.

२८८ विधानसभेच्या जागांसाठी ७ हजार ०७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ४ हजार १४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

काय म्हणाले अजित पवार ?
मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू. लोकसभा निवडणुकीतही आमच्याच कुटुंबातील दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक सर्वांनी पाहिली आहे. यावेळीही ते घडले आहे, मला विश्वास आहे की, बारामतीची जनता मला विजयी करेल.