मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. एकूणच सर्वत्र चर्चा आहे ती केवळ आगामी निवडणुकीची… अर्थात कुणाचं सरकार सत्तेत येणार ? कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार ? असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेत आहेत. अशात एका वृत्ताचा चकित करणारा सर्व्हे समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात कुणाचं सरकार सत्तेत येणार ? याची चर्चा तर आहेस. पण निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार ? याचीही चर्चा होत आहे. याबाबतही एका वृत्ताने सर्व्हे केला आहे.
या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २७ % लोकांनी पसंती दिली आहे. तर २३ % लोकांनी उद्धव ठाकरेंना आपली पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं २१ % लोकांना वाटतं आहे.
दरम्यान, हा केवळ सर्व्हे आहे. अजून विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर निकाल लागेल आणि मग राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होऊ शकतो.