शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडत आहे. दरम्यान, एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाला दिले आहेत.
दोन आठवड्यानंतर या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे. दोन्ही घट एकमेकांना कागदपत्र देणार आहेत. ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आले. मात्र शिंदे गटाकडून कागदपत्र दाखल आले नाहीत. त्यामुळे दोन्ही गटाने उर्वरीत कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे म्हणाले, अनिल सिंघ यांनी बाजू मांडली. दोन्ही गटा एका आठवड्यात म्हणण मांडणार आहेत. लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे. दोन्ही गटाला एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.