मेष (Aries) : सवयींबाबत जागरूक असावे
weekly Horoscope : या आठवड्यात आपल्याला आरोग्यासंदर्भात काही विपरीत तर घडणार नाही, याची काळजी घ्यावयास हवी. या काळात खाण्यापिण्याच्या सवयींबाबत जागरूक राहावयास हवे. विशेषतः व्यसने असलेल्यांनी काळजी घ्यावी. या राशीच्या तरुण वर्गास जीवनाचा जोडीदार शोधण्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नवदाम्पत्यांना संततीसाठी अनुकूल योग लाभू शकतात. काहींना मोठ्या खरेदीचे योग लाभू शकतात. या सप्ताहात वाहने सावकाश व सांभाळून चालवावीत. अपघाताच्या शक्यता टाळावयास हव्यात.
शुभ दिनांक – 4, 6, 8, 9.
वृषभ (Taurus) : अनावश्यक खर्च टाळावा
या आठवड्यात लाभलेली ग्रहस्थिती आर्थिक दिग्मूढता निर्माण करू शकते. त्यामुळे या सप्ताहात आर्थिक व्यवहारात अतिशय सावध असावे. अनावश्यक खर्च टाळावा. कोणावरही विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नयेत. पैसे सांभाळून ठेवावयास हवेत. खरेदी करताना तारतम्य असावे. व्यवसायात नवी गुंतवणूक, व्यवसाय विस्तार याबाबतचे निर्णय घेताना सावध असावे. तूर्त काही दिवस या संबंधातील निर्णय बाजूला ठेवणे जास्त श्रेयस्कर राहील. या राशीच्या काही युवकांना लवकरच विवाह योग लाभावेत.
शुभ दिनांक – 5, 7, 8, 10.
मिथुन (Gemini) : धोक्यांपासून सावध असावे
weekly Horoscope : या आठवड्यात लाभलेल्या ग्रहयोगांची आपणास सुरुवातीला उत्तम व उत्तरार्धात काहीशी मन खट्टू करणारी फळे मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा आरोग्याचे प्रश्न आणि खर्चवाढ या अनुषंगाने जरा त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः शेअर बाजार, सट्टेबाजार, वायदे बाजाराशी संलग्न असलेल्या व्यक्तींना अचानक व झटपट प्रक्रियेचे स्वरूप मिळत असल्याचा अनुभव येऊ शकतो. गुंतवणुकीमध्ये मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करीत असताना पुरेशी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहने सांभाळून चालवावी.
शुभ दिनांक – 4, 5, 7, 8.
कर्क (Cancer) : वागण्यावर नियंत्रण हवे
आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता नोकरी-व्यवसायात आपले महत्त्व वाढू शकते. आपल्या काही योजनांना मोठे यशही प्रदान होऊ शकते. काही धाडसी पावले उचलण्याचेही बळ मिळू शकेल. त्याचवेळी आपणास स्वतःच्या स्वभावावर, वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दुसरीकडे आपणास आरोग्याची काळजी घेण्यासही हे ग्रहमान सुचवीत आहे. औषधे, पथ्ये सांभाळली पाहिजेत. वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबातील कुणाच्या प्रकृतीच्या कारणामुळे अचानक धावपळ करावी लागू शकते.
शुभ दिनांक – 5, 7, 8, 9.
सिंह (Leo) : कामे लांबणीवर पडणार
weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास काही विशेष घडामोडींचा जाण्याची संभावना जरा कमीच आहे. आपल्या योजना व विचाराधीन कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक आवक मात्र सुरळीत राहील. त्यामुळे त्याबाबत मानसिक समाधान व एकप्रकारची निश्चिंतता आपण अनुभवू शकाल. आपणास संततीविषयक काही प्रश्न सतावू शकतात. आपणास आरोग्याची काळजी घ्यावयास हवी. वाहने काळजीपूर्वक चालावावीत.
शुभ दिनांक – 4, 5, 6, 9.
कन्या (Virgo) : प्राधान्यक्रम बदलावा लागेल
हा आठवडा आपणास काहीसा संमिश्र जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यशाच्या संबंधाने एखादा चांगला योग सुरुवातीस लाभून तो आपणास आनंद व उत्साह देणारा ठरेल. मात्र, उत्तरार्धात काही पेच निर्माण होऊन आपल्या धोरणात, व्यवहारात परिस्थितिनुरूप बदल करावा लागू शकतो. कुटुंबात एखाद्या व्यक्तीचे गंभीर आजारपण उद्भवून त्यात आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडू शकतात. यंत्रसामग्री किंवा व्यावसायिक वाहनाच्या वारंवारच्या बिघाडामुळेही आपण त्रस्त होऊ शकता.
शुभ दिनांक – 5, 6, 9, 10.
तूळ (Libra) : प्रयत्न वाढविण्याची गरज
weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहमान विचारात घेता, मधल्या काही काळात आपण अनुभवलेल्या आनंद, उत्साह व यशदायक योगांचा वेग आता काही काळ मंदावण्याची शक्यता आहे. होऊ घातलेली कामे अचानक लांबणीवर पडतील. हातची कामे बारगळू शकतात. निराश न होता या आठवड्यात आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देण्याची गरज आहे. यामुळे हा काळ अतिशय कार्यमग्नतेचा आणि धावपळीचा जाऊ शकतो. एखादे जुने दुखणे अचानक डोके वर काढू शकेल. त्यामुळे वेळीच औषधोपचार घेऊन आरोग्य राखावे.
शुभ दिनांक – 4, 7, 9, 10.
वृश्चिक (Scorpio) : सावध राहण्याचा इशारा
या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान आपणास व्यवसाय, नोकरी व प्रकृतीसह सर्चव बाबतीत अत्यंत सावध राहण्याचा इशारा देत आहे. या काळात केलेली एखादी गुंतवणूक फसवी ठरून पैसा अडकून राहू शकतो. कुटुंबात एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी आपणास उचलावी लागू शकते. नोकरीत असलेल्यांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध असावे. व्यसनांवर नियंत्रण हवे. काही जुनी दुखणी वाढू शकतात. वाहने सांभाळून चालवावीत. कुटुंबातील एखाद्याच्या प्रकृतीमुळे धावपळ करावी लागू शकते.
शुभ दिनांक – 4, 6, 7, 10.
धनु (Sagittarius) : प्रतीक्षा करावी लागणार
weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहमान खरे तर आनंदयोग ठरावयास हवा, परंतु आठवड्याच्या मध्यात परिस्थिती काहीशी बदलत असल्यामुळे आपणास यशासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उत्तरार्धात काहीसे निराशेचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यापासूनच आपल्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. अगोदरपासून नोकरी किंवा व्यवसायात असलेल्यांनी काही बदल करावयाची इच्छा असेल तरी तूर्त थांबावे.
शुभ दिनांक – 5, 7, 9, 10.
मकर (Capricorn) : कुसंगती टाळावयास हवी
या आठवड्यात आपल्याला विशेषत्वाने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या सप्ताहातील ग्रहमान आरोग्याच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. शारीरिक दुखापतींपासून स्वतःला जपण्याचा इशारा ग्रह देत आहेत. या काळात वाहने सांभाळून चालवावयास हवीत. कोणतेही धाडस, कोणताही प्रयोग, स्टंट अंगलट येऊन अपघातास आमंत्रण ठरू शकते. विजेच्या व आगीच्या उपकरणांचा वापर करताना पुरेशी खबरदारी घ्यावयास हवी. आपल्या भोवतालच्या व्यक्तींची खात्री करूनच संबंध ठेवा. कुसंगती टाळावयास हवी.
शुभ दिनांक – 4, 6, 7, 9.
कुंभ (Aquarius) : मुलांच्या प्रगतीने आनंद
weekly Horoscope : या आठवड्याच्या आरंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपणास हा सप्ताह संमिश्र स्वरूपाची फले देणार असल्याचे दिसते. पूर्वार्धात मनास आनंद व समाधान लाभेल अशा काही घटना घडताना दिसतील. विशेषतः मुलांच्या परीक्षांचे निकाल, प्रगतीच्या वार्ता आपणास हर्षित करतील. मुलांना व्यावसायिक यश मिळू शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र आर्थिक व्यवहारात सावध राहावयास हवे. फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वीज व आगीच्या उपकरणांचा वापर करताना सावध असावे.
शुभ दिनांक – 4, 7, 8, 10.
मीन (Pisces) : तणाव, कटकटीचे वातावरण
weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीला लाभलेले ग्रहमान काही उपद्रवकारी परिस्थिती निर्माण करणारे आहे. त्यामुळे व्यावसायिक व कौटुंबिक स्तरावर पुढले काही दिवस जरा तणावाचे राहण्याची शक्यता दिसते. या काळात कुटुंबात काही वादविवाद, मतभेद निर्माण होत असतील तर ते वेळीच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करावेत. नोकरी-व्यवसायात काहीसे कटकटीचे वातावरण राहील. त्यामुळे कोणतेही नवे पाऊल उचलताना पुरेशी सावधगिरी बाळगावी. सुदैवाने आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्यावर बेतेल असा कोणताही धोका पत्करू नये. वाहने सावधपणे चालवावीत.
शुभ दिनांक – 4, 6, 8, 10.
– मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746