आता लक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे !

 

दिल्ली वार्तापत्र

– श्यामकांत जहागीरदार

bjp in south india येत्या काही दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक तर्फे केली जाऊ शकते. याआधी त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्ड या ईशान्येकडील तीन राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. या तीनही राज्यांतील सत्ता कायम ठेवण्यात भाजपाला आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने यश मिळाले. bjp in south india आता भाजपासमोर कर्नाटकातील सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. कर्नाटक हे दक्षिण भारतातील भाजपाचे प्रवेशद्वार मानले जाते. कर्नाटक वगळता आजवर दक्षिण भारतातील एकाही राज्यातील निवडणूक भाजपाला जिंकता आलेली नाही. bjp in south india त्यामुळे यावेळी पुन्हा कर्नाटक जिंकून दक्षिण दिग्विजय करण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, यावेळची कर्नाटक विधानसभेची निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक राहणार आहे, यात शंका नाही. bjp in south india आतापर्यंत जे काही निवडणूकपूर्व सर्वेक्षण आले, त्याने भाजपाची चिंता वाढवली आहे.

bjp in south india २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान झाले होते. १५ मे रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपाने सर्वाधिक म्हणजे १०४ जागा जिंकल्या होत्या. ८० जागा मिळवणारी काँग्रेस दुसèया स्थानावर होती. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरला ३७ जागा मिळाल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्याचा अधिकार भाजपाला होता, पण बहुमत जमवण्यात अपयशी ठरल्यामुळे भाजपा राज्यात सरकार स्थापन करू शकली नाही. काँग्रेस आणि जनता दल यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. bjp in south india भाजपाला राज्यात ३६.३५ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला भाजपापेक्षा कमी जागा मिळाल्या; मात्र काँग्रेसच्या मतांची टक्केवारी भाजपापेक्षा जास्त होती. काँग्रेसला ३८.१४ टक्के मते मिळाली होती. जनता दल सेक्युलरला १८.३० टक्के मते मिळाली. विशेष म्हणजे राज्यात या तीन प्रमुख पक्षांशिवाय चौथ्या कोणत्याही पक्षाची डाळ शिजली नाही. नाही म्हणायला बहुजन समाज पक्षाने एक जागा जिंकली. त्यामुळे यावेळीही राज्यात भाजपा, काँग्रेस आणि जदसे अशी तिरंगी लढत होणार आहे. bjp in south india सरळ लढतीचा भाजपाला फटका बसतो, तर तिरंगी लढतीचा नेहमीच भाजपाला फायदा मिळतो, असा इतिहास आहे.

२०१८ मध्ये राज्यात कोणताच पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे काँग्रेसने जनता दल सेक्युलरला सरकार स्थापन करण्यासाठी पाठींबा दिला. काँग्रेसच्या पाठींब्याने एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. bjp in south india मात्र, राज्यातील आघाडीचे हे सरकार फार काळ टिकले नाही. जवळपास सव्वा वर्षाच्या आतच कुमारस्वामी सरकार पडले आणि बी. एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करण्यात भाजपाला यश मिळाले. मात्र, येदीयुरप्पा यांनाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. भाजपाने राज्यात नेतृत्वबदल करीत येदीयुरप्पा यांच्या जागेवर बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. आताची निवडणूक भाजपा बोम्मई यांच्या नेतृत्वात लढवत असला, तरी भाजपाने त्यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. bjp in south india भाजपा आपल्या नेहमीच्या पद्धतीने कर्नाटक विधानसभेची निवडणूकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि चेह-यावर लढवणार आहे. बोम्मई मुख्यमंत्री असले तरी ते येदीयुरप्पा यांच्यासारखे लोकप्रिय नेते मानले जात नाहीत. मुळात बोम्मई हे मूळचे भाजपावाले नाही, ते दुस-या पक्षातून भाजपात आले. bjp in south india तरीसुद्धा भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले आहे. येदीयुरप्पा यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक संन्यासाची घोषणा करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

bjp in south india मात्र, येदीयुरप्पा यांच्याशिवाय राज्यातील विधानसभा निवडणुकीची कल्पनाही भाजपा करू शकत नाही. त्यामुळे येदीयुरप्पा प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार नसले, तरी राज्यातील भाजपाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांच्यावरच राहणार आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाने येदीयुरप्पा यांचा संसदीय मंडळात समावेश करीत आपल्यासाठी त्यांचे महत्त्व किती आहे, हे दाखवून दिले. मोदी यांनी कर्नाटकातील आपल्या दौ-यात येदीयुरप्पा यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. येदीयुरप्पा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असले, तरी ते लिंगायत समाजाचे आहेत. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज हा राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावी आहे. या लिंगायत समाजावर येदीयुरप्पा यांचे चांगले वर्चस्व आहे. वोक्कलिंगम हा राज्यातील दुसरा मोठा प्रभावी समाज आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा वोक्कलिंगम समाजाचे आहेत. त्यामुळे वोक्कलिंगम समाज हा देवेगौडा यांचा समर्थक मानला जातो. bjp in south india राज्यात काँग्रेस आणि भाजपा यांच्यानंतर जनता दल सेक्युलर हा तिसरा राजकीय पक्ष आहे. राज्यात ज्यावेळी कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळत नाही, तेव्हा जनता दल सेक्युलर किंगमेकरच्या नाही तर किंगच्याच भूमिकेत असतो.

विशेष म्हणजे जदसेने राज्यात आतापर्यंत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत आघाडी सरकार स्थापन केले आहे. bjp in south india या दोन्ही वेळी जदसेच्या आमदारांची संख्या कमी असतानाही कुमारस्वामीच मुख्यमंत्री झाले. या दोन्ही पक्षांसोबतचे कुमारस्वामी यांचे सरकार फार काळ टिकले नाही, हा भाग वेगळा. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या जदसेला तसे भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या अस्पृश्य नाही. bjp in south india यावेळी आम्ही जदसेसोबत आघाडी करणार नाही, असे काँग्रेसने जाहीर केले असले तसेच सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही भाजपा वा काँग्रेस यापैकी कोणाला पाठींबा देणार नाही, असे कुमारस्वामी यांनी म्हटले असले, तरी त्यात काही तथ्य नाही. bjp in south india निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे आकडे खरे ठरले आणि राज्यात कोणत्याच पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले नाही, तर आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा वा काँग्रेस यांना जदसेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता कोण काय बोलतो, याला फारसा अर्थ नाही. bjp in south india भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा प्रयत्न स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविण्याचा राहणार आहे, यात शंका नाही.

bjp in south india काँग्रेससाठी यावेळी कर्नाटक विधानसभेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची राहणार आहे. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे कर्नाटकचे आहेत. त्यामुळे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत खडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये २००४ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, याकडेही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. २००४ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक म्हणजे ७९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ६५ तर जदसेला ५८ जागा मिळाल्या होत्या. bjp in south india मात्र, भाजपाला आपले सरकार बनवता आले नव्हते. राज्यात जदसे आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार बनवले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर सर्वात मोठे आव्हान भ्रष्टाचाराचे आहे. राज्यातील भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. bjp in south india माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पाही भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटू शकले नाहीत. भाजपाची सर्वात मोठी अडचण ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका भाजपा आमदाराच्या घरी सापडलेल्या कोट्यवधींच्या रोख रकमेमुळे झाली आहे. bjp in south india पंतप्रधान मोदी यांच्या ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ या मोहिमेला अशा घटनांमुळे धक्का बसतो, हे नाकारता येणार नाही.

मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास आहे. bjp in south india जवळपास नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी यांच्यावर तसेच, त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर आतापर्यंत एक रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. देशाच्या इतिहासात एवढे स्वच्छ आणि चारित्र्यवान सरकार आजपर्यंत कधी मिळाले नाही. २००४ ते २०१४ या संपुआ सरकारच्या काळात मंत्रिमंडळातील जवळपास सगळ्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. bjp in south india तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा प्रत्यक्ष आरोप झाला नसला, तरी भ्रष्ट मंत्र्यांचे नेतृत्व करण्याचा डाग त्यांच्या स्वच्छ कुर्त्यावर लागला होता, हे मान्य करावेच लागेल. टोपलीतील एक सडका आंबा उर्वरित आंबे सडवत असतो, याची जाणीव ठेवत आपल्या टोपलीत असा एकही सडका आंबा राहणार नाही, याची येत्या काळात भाजपाला काळजी घ्यावी लागणार आहे. चुकून एखादा सडका आंबा आला असेल तर तो लगेच फेकून देत आपले उर्वरित आंबे खराब होणार नाहीत, याची काळजी कर्नाटकमध्ये भाजपाला घ्यावी लागणार आहे. bjp in south india काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी व्यक्तीची पाठराखण केली जाते, तर भाजपामध्ये भ्रष्टाचारी व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली जाते, हा काँग्रेस आणि भाजपच्या संस्कृतीमधील फरक भाजपाच्या नेतृत्वाला जनतेला दाखवून द्यावा लागणार आहे.

९८८१७१७८१७