---Advertisement---
नंदुरबार : येथील भर रस्त्यावरील एटीएम उत्तररात्री फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना नवापूर पोलिसांनी १२ तासांच्या आत ताब्यात घेत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सर्व संशयित हे गुजरात राज्यातील उच्छल तालुक्यातील आहेत.
संशयितांमध्ये सुमित दानियल गामित (१९), जस्टीनकुमार दिलीप गामित (१९) (रा. भिंतखुर्द, ता. उच्छल), जतीन मोना गामित (१९), गणेश जीवन गामित (१९) (रा. रावजीबुधा, ता. उच्छल) व इतर दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ असलेले स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. नवापूर पोलिस ठाण्याचे पथक रात्री गस्तीवर असताना त्याठिकाणी आले असता, पोलिसांची चाहूल लागताच संशयित अंधारात गल्लीबोळांचा फायदा घेऊन तेथून पसार झाले.
गस्तीवरील पथकाने एटीएममध्ये जाऊन पाहणी केली असता, एटीएमचा लहान दरवाजा तोडलेला, सेन्सॉर वायरी कापलेल्या आढळल्या. यानंतर लागलीच पथकाने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.
अधिकारी व फॉरेन्सिक विभागाचे पथक दाखल झाले. संशयित येण्या-जाण्याच्या मार्गाचा मार्गावरील त्या अंदाज लावून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात काही महत्वाचे धागेदोरे मिळाले.
संशयितांच्या हालचाली सीसीटीव्हीत नोंदविण्यात आल्या आणि तांत्रिक विश्लेषण करून लागलीच पथक तपासासाठी पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलाची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या चौकशीवरून इतरांची २ माहिती घेतली असता त्यात आणखी इतर पाचजण सहभागी असल्याचे सांगण्यात आले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लोखंडी विळा, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अतिरिक्त अधीक्षक आशित कांबळे, पोलिस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे, हवालदार किशोर वळवी, राजधर जगदाळे, मोहन शिरसाठ, दिनेशकुमार वसुले, संजय रामोळे, सुरेंद्र पवार, किशोर वळवी, अतुल पानपाटील, दिनकर चव्हाण, रवींद्र भोई, समाधान केंद्रे, अमृत पाटील, नेहरू कोकणी, प्रमोद गुजर, प्रकाश कोकणी, स्वप्नील वाळके, संजय रामोळे, पुरुषोत्तम साठे यांनी ही कारवाई केली.