पत्रकारांवर गुंडांचा हल्ला ; मंत्री गिरीश महाजन यांनी दिली कडक कारवाईची ग्वाही

---Advertisement---

 

नाशिक : नाशिकच्या काही पत्रकार बांधवांवर त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून, त्यांच्या सोबत झालेले असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले .

शनिवारी या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेला पत्रकार किरण ताजणे यांची मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील अपोलो रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहे प्रकरण ?

काही गुंड अनधिकृतपणे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती वसूल करत होते. दरम्यान, येथे साधू -महंत यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार आले होते. या पत्रकारांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत तीन ते चार पत्रकार जखमी झाले. इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढारीचे पत्रकार किरण ताजणे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर किरण ताजणे यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पुरावे उपलब्ध आहेत. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. पत्रकारांना मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी गंभीर जखमी पत्रकार किरण ताजणे यांची अपोलो रुग्णालयात भेट घेतली. यावेळी मंत्री महाजन यांनी पत्रकारांवर केलेला हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---