तरुण भारत लाईव्ह । १९ जानेवारी २०२३। आतापर्यंत, आयफोन मॉडेल्सच्या सुमारे एकवीस पुनरावृत्ती आलेल्या आहेत. iphone 2G, iphone 3G, असे आयफोन चे अनेक मॉडेल्स निघालेत. नवीन वर्षाच्या सुरवातीला आयफोन १५ प्रो मॅक्स हा लाँच होणार आहे असे वृत्त आले होते. मात्र काही कारणास्तव सीरीजच्या लाँचिंगला उशीर झाला. परंतु, नवीन सीरिजचं डिझाईन समोर आलं आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सचे डिजाईन लाँच झाले आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन आयफोन घेणार असाल तर आधी हे डिझाइन्स पाहून घ्यायला हरकत नाही.
आयफोन १५ प्रो मॅक्स चा लूक्स खूप आकर्षक आहे. या फोन तुम्ही पाहिलात तर तुम्ही हा फोन खरेदी केल्याशिवाय रहाणार नाही. आयफोन 14 च्या तुलनेत आयफोन १५ प्रो मॅक्स मध्ये एलईडी लाईटसुद्धा मोठी असेल. आयफोन १५ प्रो मॅक्स या फोन मध्ये कॅमेरा पण मल्टीफोकल कॅमेरा आणि पेरिस्कोप लेन्स असणारा हा कॅमेरा ड्युअल मॉड्यूल आहे.
आयफोन 14 प्रो रेंजची किंमत भारतासह जगातील अनेक भागांमध्ये जास्त आहे. पुढील वर्षीही हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन प्रो मॉडेलची किंमत किती असेल हे स्पष्ट नाही, परंतु हे स्पष्ट आहे की आयफोन 15 प्रो मॅक्स एक महाग डिव्हाइस असेल.