भुुसावळ : पश्चिम रेल्वेच्या उधना यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनईच्या कामामुळे रविवार, 5 रोजी ब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम रेल्वेतून सूरतकडून येणार्या व जाणार्या 10 रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या तर दोन या शॉर्ट टर्मिनेट केल्या असून 16 गाड्यांचे मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.
या रेल्वे गाड्या केल्या रद्द
पश्चिम रेल्वेने ब्लॉकमुळे (22137) नागपूर-अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी रविवारी (दि.5) नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. (09051) मुंबई-भुसावळ स्पेशल फेअर एक्स्प्रेस ही रविवारी (दि. 5) मुंबईतून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. (20925) सुरत – अमरावती एक्सप्रेस ही गाडी रविवारी (दि. 5) सुरतहून सुटणारी रद्द करण्यात आली आहे. (19005) सुरत-भुसावळ एक्स्प्रेस ही रविवारी (दि.5) सुरतहून सुटणारी गाडी रद्द केली आहे. (11127) भुसावळ-कटनी एक्स्प्रेस सोमवारी (दि. 6) भुसावळहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच अप मार्गावरील गाड्यामध्ये (22138) अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस रविवार-अहमदाबादहून सुटणारी गाडी रद्द (20926) अमरावती – सुरत एक्सप्रेस रविवारी (दि.5) अमरावतीहून सुटणारी गाडी रद्द केली आहे. (19007) सुरत-भुसावळ एक्स्प्रेस रविवार (दि.5) सुरतहून सुटणारी गाडी रद्द झाली आहे. (19006) भुसावळ-सुरत एक्स्प्रेस रविवार (दि. 5) भुसावळहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. (11128) कटनी – भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवारी (दि.7) कटनी येथून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
शॉर्ट टर्मिनेट गाड्या
गाडी (19006) भुसावळ-सुरत ही उकाई सोनगढपर्यंत धावेल आणि उकाई सोनगढ-सुरत दरम्यान रविवारी रद्द केली आहे आणि ब्लॉकनंतर रीकामी रेक सुरत येथे पाठविला जाईल तसेच डाऊन मार्गावरील (19008) भुसावळ – सुरत ही गाडी रविवारी (दि. 5) बारडोली येथे शॉट टर्मिनेट होईल.
मार्ग बदल केलेल्या गाड्या
गाडी (19045) सुरत-छपरा ही गाडी रविवारी (दि.5) सुरतहून सुटणार आहे, ती गाडी वडोदरा, रतलाम, संत हिदाराम नगरमार्गे धावणार आहे. ओखा-शालिमार – ओखा ही गाडी रविवार सुटून छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ, इटारसी, नागपूरमार्गे धावणार आहे. राजकोट – रीवा ही गाडी रविवारी राजकोटहून सुटणार आहे, ही गाडी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळवली आहे. अहमदाबाद-चेन्नई ही गाडी अहमदाबादहून सुटेल, रविवारी छायापुरी, नागदा, मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ, इटारसी, नागपूर, वर्धा मार्गे वळवली जाईल, अहमदाबाद-हावडा ही गाडी रविवारी अहमदाबादहून सुटणार आहे, ती छायापुरी, नागदा.मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ,भुसावळ मार्गे वळवली जाईल, अहमदाबाद – बरौनी ही गाडी सोमवारी (दि.6) अहमदाबादहून सुटणारी गाडी छायापुरी, नागदा. मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, बिना मार्गे वळवली जाईल, अहमदाबाद-पुरी ही गाडी रविवारी अहमदाबादहून सुटेल, ती छायापुरी, नागदा मार्गे वळवली जाईल. मस्की जंक्शन, संत हिदाराम नगर, भोपाळ, भुसावळ मार्गे जाणार आहे. चेन्नई – अहमदाबाद हीगाडी चेन्नईहून सुटणार असून शनिवारी (दि. 4 मार्च) भुसावळ कॉर्ड लाईन, अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, छायापुरी मार्गे वळवली आहे. छपरा – सुरत ही गाडी शनिवारी (दि. 4) छपरा येथून निघेल, ती भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, रतलाम, गोध्रा, वडोदरा, सुरत मार्गे वळवली जाईल. पुरी अहमदाबाद पुरीहून सुटणारी गाडी शनिवारी (दि. 4) भुसावळ कॉर्ड लाइन, अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, छायापुरी मार्गे वळवली जाईल. मालदा टाउन – सुरत ही गाडी मालदा टाउनहून शनिवारी (दि. 4) निघेल. ही गाडी भुसावळ कॉर्ड लाइन अकोला, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, वडोदरा मार्गे वळवण्यात येईल. वांद्रे टर्मिनस-सहरसा ही गाडी वांद्रे टर्मिनसवरून सुटेल शनिवारी (दि. 4) वडोदरा, नागदा, मकसी, संत हिरडाराम नगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळवली आहे. रीवा-एकता नगर रीवा येथून शनिवारी (दि. 4) इटारसी, भोपाळ, संत हिरडाराम नगर, माकसी, नागदा, वडोदरामार्गे वळविली आहे. पुरी-गांधीधाम ही गाडी पुरीहून सुटणार असून शनिवारी (दि. 4), शालीमार – पोरबंदर ही गाडी शालिमारहून सुटणार असून शनिवारी (दि. 4) भुसावळ कॉर्ड लाइन अकोला, भोपाळ, रतलाम, छायापुरी मार्गे वळवली आहे. सुरत छपरा क्लोन सुरत आर ही गाडी सोमवारी (दि. 6) वडोदरा, नागदा, संत हिरडाराम नगर, भोपाळ, इटारसी मार्गे वळविली आहे. काचेगुडा – बिकानेर ही गाडी शनिवारी (दि. 4) काचेगुडा आर ही गाडी अकोला, खंडवा, भोपाल, संत हिरडाराम नगर, रतलाम, चित्तौरगढ़,चंदेरिया, अजमेर बिकानेरमार्गे वळविली आहे.