तरुण भारत लाईव्ह ।१३ फेब्रुवारी २०२३। ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक 2023 Audi Q3 Sportback लाँच केली. याचे कोणते भन्नाट फीचर्स आपल्याला पहायला मिळतील हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
Audi Q3 Sportback या गाडीमध्ये यात क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि २.० लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन दिले आहे. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक १९० एचपी पॉवर आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक वेगवान कार आहे आणि फक्त ७.३ सेकंदात शून्य ते १०० किमी/तास वेग पकडते. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.
नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक कारला ५१ लाख ४३ हजार रुपये एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक एस-लाइन एक्स्टीरिअर पॅकेजसह स्पोर्टीयर व शार्पर आहे, तसेच तिची कूपे-सारखी डिझाइन व स्टायलिश नवीन अलॉई व्हील्स असलेली विभागातील पहिलीच कार आहे.
या गाडीमध्ये ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टम ऑडी स्मार्टफोन इंटरफेस २-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा कम्फर्ट की सह गेस्चर कंट्रोल्ड टेलगेट इलेक्ट्रिकली चालू-बंद होणारे लगेज कम्पार्टमेंट लिड एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर-अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूंनी ऑटो-डिमिंग फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर-व्ह्यू मिरर स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज ६ एअरबॅग्ज हे फीचर्स पहायला मिळतील. तुम्ही जर नवी कार खरेदी करायचा विचार करत असाल तर हि गाडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.