T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. हा सामना ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी 20 वर्ल्डकप 2024 सुपर 8 च्या ग्रुप 1 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना भारत – ऑस्ट्रेलिया सामना होत आहे. गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानने पराभव केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला सेमी फायनल गाठण्यासाठी भारताला पराभूत करावंच लागणार आहे.
दुसरीकडे भारत जवळपास सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. मात्र भारताकडे वनडे वर्ल्डकप 2023 मधील फायनलच्या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा नक्कीच होईल.