अवकाळीनं एप्रिल महिन्यातही गाठलं, खान्देशमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह.., नागरिकांची तारांबळ

Rain : हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात ७ ते ८ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.  त्यानुसार पावसाने अनेक भागात हजेरी लावली आहे. खान्देशमध्ये देखील अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली .  

धुळेच्या साक्री तालुक्यासह शिंदखेडा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्‍यातील काही भागात आगामी तीन-चार दिवस अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यानुसार राज्‍यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून वातावरणात देखील बदल झाला असून उन्‍हाची तिव्रता कमी होवून ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेत देखील काहीसा गारवा असल्‍याचे जाणवत आहे. 

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास साक्री तालुक्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर शिंदेखेडा तालुक्यात देखील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाला देखील फटका बसण्याची दाट भीती शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.