---Advertisement---

मल्हार कुंभार कृषी भूषण पुरस्कराने सन्मानित

---Advertisement---

---Advertisement---

पारोळा : चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार कुंभार यांना सरपंच सेवा संघतर्फे नुकतेच कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शेती माती व शेतकरी यांच्यासोबत एकनिष्ठ राहून शेती क्षेत्र एक नोकरी व व्यवसायच्या दृष्टीकोनातून पाहणारे युवा शेतकरी मल्हार कुंभार यांच्या कार्याची दखल घेवून  सरपंच सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) यांनी राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार २०२३ देऊन सन्मान केला.
हा सोहळा अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी युवकांनी ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती केल्यास निश्चितचपणे शेतकरी आत्मनिर्भर होऊन शेती क्षेत्रामार्फत आर्थिक स्थैर्य उपलब्ध होईल, असे मत मल्हार कुंभार यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---