Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, पहा फोटो

Ayodhya : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्त मृगाशिरा नक्षत्रात होणार आहे. 22 जानेवारी रोजी मृगाशिरा नक्षत्रातील अभिजीत मुहूर्तावर दुपारी 12:20 वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. या काळात रात्री 11:36 ते 12:24 अशी एकूण 48 मिनिटे शुभ मुहूर्त असेल, तर मृगाशिरा नक्षत्र 22 जानेवारीला पहाटे 5:15 ते 23 जानेवारीला पहाटे 5:36 पर्यंत असेल. आता फक्त २२ जानेवारीला अर्थात राम ललाच्या  अभिषेक सोहळ्याला  ११ दिवस बाकी असल्याने कामात गती आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी कामाचा आढावा घेतला.  दरम्यान, आत्तापर्यंत झालेल्या कामाचे आणि साधू संतांसाठी केलेली व्यवस्था याचे काही फुटेज “तरुण भारत लाईव्ह”च्या प्रतिनिधींनी घेतले आहे.

साधुसंतांची राहण्याची व्यवस्था

होम हवन ठिकाणी जाताना करण्यात आले प्रवेशद्वार

हवामान मंदिरामध्ये दररोज 5000 पेक्षा अधिक भाविक भक्त मोफत जेवण करतात

रस्त्यावरील धूळ, माती उडू नये म्हणून प्रशासनातर्फे अशा पद्धतीने रस्ते धुतल्याले जात आहेत.

मोकाट गुरांना  प्रशासनातर्फे ताब्यात घेऊन गो शाळेत सोडण्यात येत आहे.

राम मंदिराचे काम वेगात सुरू