CM अयोध्या दौरा : ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’, शिवसेनेकडून टीझर जारी

Politics : शिवसेना नाव आणि धनुष्यचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. 9 एप्रिलला अयोध्येचा दौरा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यानच साधू, संत आणि महंतांकडून मुख्यमंत्री शिंदे हे शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये ते राम जन्मभूमीचे दर्शन घेतील, तसेच शरयू नदीकाठी आरतीही होणार आहे. या दौऱ्याचा टीझरही शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्ताने शिवसेनेकडून एक टीजर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ असं म्हटलंय. अयोध्या दौऱ्यानतंर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात शिवधनुष्य यात्रा सुरू करणार आहेत.

या टीजरमध्ये राज्यात सुशासन असावं आणि रामराज्यात शासक नाही तर सेवक असावा असा उल्लेख केला आहे. “जनताच कुटुंब असावी आणि मानवाची सेवा हीच सर्वात महत्वाची असावी. अन्यायाच्या विरोधात आवाज उठेल आणि भगवा कधीच खाली येणार नाही. कणाकणात राम असावा,” असेही या टीझरमध्ये सांंगण्यात आले आहे.

महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा, असे मुद्दे या टिझरवरून अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सोशल मीडियावर हा टीझर वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन असून राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे.

Image
अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ… #शिवसेनाएकनाथशिंदे