---Advertisement---

Babasaheb Patil : सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्यात

---Advertisement---

जळगाव : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरुवारी (२९ मे) रोजी अमळनेर येथे एका बँकेच्या ‘शतक महोत्सवी वर्ष’ या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अजिंठा विश्रामगृहावरून राधाकृष्ण वाडीत खान्देश जिन प्रेस फॅक्टरी ओनर्स अँड ट्रेडर्स डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांच्या निवासस्थानी भेट देतील.

साडेआठ वाजता आहुजानगर येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश देसले यांच्या निवासस्थानी जातील आणि तेथून अमळनेरकडे प्रयाण करतील. सकाळी साडेदहा वाजता अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. अमळनेर या बँकेच्या ‘शतक महोत्सवी वर्ष’ या कार्यक्रमास उपस्थिती देतील. दुपारी, जळगाव जिल्हा बँकेस भेट देऊन छत्रपती संभाजीनगरला ते खाना होणार आहेत.

जळगावसह ‘या’ पाच तालुक्यांचा ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश

जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे, हा निर्णय जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत मैलाचा दगड ठरणार असून, मोठ्या, मध्यम व लघु उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे,आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला हे यश मिळाले असून, जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि यावल या पाच तालुक्यांनाही ‘डी प्लस झोन’ मिळाला आहे. यामुळे आता संपूर्ण जिल्हा सवलतींच्या झोनमध्ये आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---