Bacchu Kadu News : एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बच्चू कडू महायुतीसोबत आले होते. मात्र आता तेच बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळता आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे
दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रम झाले आहे. दिव्यांगाना निधी न दिल्यास आम्ही तुमच्यासोबत आमदार असलो तरी ‘आपको हम भूल जायेंगे’ असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.
दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे. दिव्यांगांचं भलं कसं होणार. नोकरी नाही तर दिव्यांगांना उद्योगासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी चौफेक काम करणे गरजेचं आहे. मागील ७५ वर्षांत दिव्यांगांसाठी काही खास काम झालेले नाही. अनेक गोष्टी करणे बाकी आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
अतिरेक होऊ नये, खासदार निलंबनावर प्रतिक्रिया
एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा अतिरेक होऊ नये, संसदेच बळ हे राजकीय बळ म्हणून भाजप वापरत आहे. संसदेचं बळ सामान्य माणसासाठी वापरले गेले पाहिजे. सगळ्यांना सरसकट निलंबित करणे म्हणजे उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, तसे करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.