मुंबई : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात दमदाटी करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यांना ही शिक्षा एकत्रच भोगावी लागणार आहे. आता बच्चू कडू हे या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागतील. त्यानंतर या प्रकरणात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
२०१७ साली दिव्यांगांच्या मागण्यासाठी बच्चू कडू यांनी महापालिकेच आंदोलन केलं होतं या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अभिषेक कृष्णा नावाचे आयुक्त असताना बच्चू कडू महानगरपालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांच्यात आणि आयुक्तांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती. त्यावेळी कडू आयुक्तांवर धावून गेले होते यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.