तलाठी भरतीतील गोंधळावरुन बच्चू कडूंचा सरकारला इशारा, म्हणाले….

अमरावती : तलाठी भरती परीक्षेत आज सकाळी नऊ वाजता पहिला पेपर होणार होता. मात्र त्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्यानं परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर खोळंबले. सकाळपासून सर्वर डाऊन असल्याने वेळेवर परीक्षा सुरू न झाल्याने केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र, सर्वर डाऊन मुळे विद्यार्थ्यांना 10 वाजता परिक्षा केंद्रात सोडण्यात आले. 10.30 वाजता परीक्षा सुरू या सगळ्या गोंधळावर आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

तलाठी परीक्षा गोंधळावर आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परीक्षा गोंधळ संदर्भात भेटणार आहेत. गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. सरकारने जर या बाबतीत मागे-पुढे पाहिलं तर सरकारच्या विरोधात उभं राहू, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. 6 महिन्यानंतरच्या सर्व परीक्षा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घ्या. कोणत्याही परीक्षासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी फक्त 1000 रुपये परीक्षा फी घ्यावी, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.