---Advertisement---

खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश, बडनेरा-नाशिक विशेष रेल्वे आता कजगावला थांबणार!

---Advertisement---

जळगाव : बडनेरा-नाशिक रोड विशेष रेल्वेला कजगाव (ता. भडगाव) येथील स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयातर्फे घेण्यात आला असून, खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे हा थांबा मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे भडगाव तालुक्यातील कजगावसह परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

भडगाव तालुक्यातील कजगाव आणि परिसरातील नागरिकांकडून कजगाव स्थानकात एक्स्प्रेस गाड्यांना थांबविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. प्रवाशांना नाशिक आणि बडनेराकडे प्रवास करण्यासाठी लांबच्या स्थानकांत जावे लागत होते. या समस्येची दखल घेत खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि कजगाव येथे गाडीला थांबा देण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने हा थांबा मंजूर केला आहे. रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अधिकृत आदश लवकरच जाहीर करण्यात येणार असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वेने या निर्णयाचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. या निर्णयामुळे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता कजगावमधूनच बडनेरा-नाशिक रोड विशेष रेल्वेचा (०१२११/०१२१२) लाभ घेता येणार असल्याने वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, खासदार स्मिता वाघ आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाने या थांब्याचा नियमित पुनरावलोकन केला जाईल, त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment