जळगाव : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात ईडीने अटकेची कारवाई केल्याने मागील १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर जळगावमध्ये शिवसेनेतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
संजय राऊत यांना जामीर मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या समोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फटाके फोडले. तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फूगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.