जळगाव : दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने २५ दिवसांत ५५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, जळगावातील एका भंगार विक्रेत्याला हा चित्रपट भावला. त्याने तब्बल २५ वेळा हा चित्रपट पाहिला आहे.
महेश दत्तात्रे जडे ता. साक्री जि. धुळे या व्यक्तीने तब्बल २५ वेळा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहिला आहे. महेश जडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातले आहेत. त्यांची आई हयात नाहीय. ते लहानपणी असतानाच कुटुंबातुन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी जळगाव गाठलं. येथे ते भंगार वेचणीचे काम करतात.
सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने फक्त २५ दिवसांत ५५ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.
विशेष म्हणजे, हा चित्रपट महेश दत्तात्रे जडे यांनाही भावला. भंगार वेचणीचे काम करून त्यांनी तब्बल २५ वेळा हा चित्रपट पाहिला आहे. तसेच त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन देखील केले.
पहा व्हिडिओ:
https://youtu.be/EaUc0AZVSpo
दरम्यान, चित्रपटाच्या अभिनेत्री, त्यांनी पडद्यावर केलेले अभिनय याशिवाय एवढा सुंदर चित्रपट कोणी लिहिला असेल? अशी चर्चा रंगली सर्वत्र रंगली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा वैशाली नाईक हिने लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी केदार शिंदेंनी तिचे कौतुक करत खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.