अग्रलेख
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव असलेल्याव फुटीनंतर शिल्लक राहिलेल्या शिवसेनेच्या ‘सूक्ष्म’ गटाचे याच नावाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची परवा Depression खेडमध्ये झालेली सभा त्यांचे आणि त्यांच्या उरल्या-सुरल्या पक्षाचे Depression नैराश्य दाखविणारी होती.
त्यात त्यांनी अनेक शेलकी विश्लेषणे लावत भाजपावर टीका केली आणि निवडणूक आयोगालाही धारेवर धरले. पण, पक्षाला नेमकी दिशा देणारे त्यांच्या भाषणात काहीही नव्हते. आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून, असा प्रश्न विचारण्याचे येथे औचित्य नसले, तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा समाचार घेणे अपरिहार्य आहे.
शिवसेनेची स्थापना स्व. बाळासाहेब ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी केली होती, हे खरे आहे. भाजपाला एके काळी गल्लीतले कुत्रेही विचारत नव्हते, असे वक्तव्य त्यांनी केले. यातला Depression टोमण्याचा भाग सोडला तर भाजपाची एकेकाळची स्थिती फार चांगली नव्हती, हेही खरे आहे. मराठी माणसे आणि हिंदुत्व या मुद्यांवर बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना एकेकाळी लढली हेही खरे आहे. पण, इतिहासातल्या कर्तृत्वावर ‘अहं ब्रह्मास्मि’ कितीही केले तरी वर्तमान आणि भविष्य घडविता येत नाही. कर्तृत्वात सातत्य असावे लागते. पक्षप्रमुख होण्यासाठी किंवा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला पाहिजे. त्याचे उत्तर असे येते की, ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत.
एखाद्याचा पुत्र असणे ही बाब लोकजीवनात मान्यता मिळण्यासाठी पुरेशी नाही, Depression हे आता तरी उद्धवजींना कळायला हवे. बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी होऊन आता दशकभराहून अधिक काळ लोटला आहे. तेव्हापासून अलिकडच्या काळापर्यंत उद्धव ठाकरे हे अखंड शिवसेनेचे सर्वेसर्वा होते. आता ते शिल्लक राहिलेल्या शिवसेनेचे प्रमुख आहेत. त्या गटाला त्यांचेच नाव मिळालेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांच्या नेतृत्वातील अखंड शिवसेनेने किंवा सध्याच्या त्यांच्या नेतृत्वातील उर्वरित शिवसेनेने लोकांसाठी काय केले, असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही.
बाळासाहेब ठाकरे २०१२ साली गेले. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार होते. दोन वर्षांत शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून काही केले किंवा लोकांच्या प्रश्नांवर रान उठविले असे उदाहरण शोधावे लागेल. Depression २०१४ मध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आले. तत्पूर्वीची दोन वर्षे विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने काहीही केले नाही, हा इतिहास पाठीशी होता. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे शिवसेना हा सत्तेतला पक्ष होता. पण, शिवसेना वागत होती विरोधकासारखी. आमचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याच्या वल्गना शिवसेनेचे नेते त्यावेळी करीत राहिले. २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचा अंत झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. Depression त्यांना अंदाजे अडीच वर्षे मिळाली. या काळात कोरोना महामारीने दीडेक वर्ष खाल्ले हे खरे आहे. पण, उद्धवजींनी राज्यात फिरण्यासाठी वेळ काढला नाही, हेही तेवढेच खरे आहे. सरकार रिमोटने चालत नसते. सत्ता नोकरशाहीकडून राबविली जाते. पण, पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदांवर बसलेल्या माणसांना फिरावे लागते. लोकांमध्ये मिसळावे लागते. त्या काळच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वत:च्या मंत्र्यांनाही भेटत नव्हते. त्यांचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या पक्षात एवढी मोठी फूट पडली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता महाराष्ट्रात त्यांच्याच मूळ पक्षाचे एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे नाव असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत.
भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. एका अर्थाने पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात आले आहे. यात आपला सहभाग नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटत Depression असणार. पण, राजकारणात हे होत असते. सत्तेत असताना मातायचे नसते आणि सत्ता नसताना प्रयत्न सोडायचा नसतो, हेच खरे राजकारण असते. त्यासाठी पूर्वेतिहास विसरून नव्याने कर्तृत्व सिद्ध करावे लागते. उद्धव ठाकरे यांचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. सतत गरळ ओकल्याने राजकारण पुढे सरकत नसते, हे उद्धवजींनी आता तरी लक्षात घ्यायला हवे. आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून ‘पन्नास खोके, एकदम ओके’चे नारे हजार वेळा लावून झाले. Depression गद्दारी बोलून झाली. मिंधे सरकार म्हणून झाले. त्याच शिव्या आणि तीच विश्लेषणे. नवे काहीही नाही. याचे कारण असे की, उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक शिवसेनेकडे सांगण्यासारखे आणि दाखवण्यासारखे काहीही नाही.
राजकारणात पैसा, जात-धर्म हे लागतेच. शिवाय, उत्तम संघटन, उत्तम कार्यक्रम, उत्तम कार्यकर्ते, उत्तम नेते हे सगळे लागत असते. ‘हिंदुत्व’ हे तत्त्व म्हणून मान्य आहे. पण, हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी किंवा हिंदुत्वाची प्रतिष्ठा राखण्यासाठी उबाठाच्या शिल्लक शिवसेनेने कोणती कामगिरी केली, असे कुणीतरी विचारायलाच हवे. मराठी माणसांना संरक्षण हे तत्त्व चांगले आहे. एकेकाळी ‘उठाव लुंगी, बजाव पुंगी’ करून मुंबईतील मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने संरक्षण दिले, हे खरे आहे. तो त्यांचा कार्यक्रम होता. उद्धव ठाकरेंनी आता हे सांगायला हवे की, आता मराठी जनांना न्याय देण्यासाठी त्यांच्या शिल्लक सेनेचे योगदान काय आहे.
Depression तत्त्वज्ञान व अधिष्ठान वेगळे आणि कार्यक्रम वेगळा. राजकारणाचा कितीही सरधोपट विचार केला तरी तत्त्वज्ञान म्हणजे कार्यक्रम होऊ शकत नाही. आम्ही हिंदुत्वाचे आणि मराठी जनांचे तारणहार असे शिल्लक सेना कितीही म्हणत असेल तरी त्यासाठी त्यांचा कार्यक्रम कोणता, हा प्रश्न शिल्लक राहतोच. एखाद्याने आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, असा कितीही गळा काढला Depression तरी त्यासाठी त्याने केले काय, त्याचा कार्यक्रम काय, असा प्रश्न उरतोच. तेच शिल्लक शिवसेनेच्या बाबतीत लागू करायचे म्हटले तर सध्या या पक्षाकडे कोणताही कार्यक्रम नाही, विचार नाही आणि तत्त्वज्ञानही नाही. जे काही ते सांगतात, ते त्यांच्या इतिहासात घडून गेले असेल तरी वर्तमानात त्यांनी त्या मुद्यांसाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिल्लक सेनेच्या प्रमुखांची वक्तव्ये आजकाल कुणी फारशी गांभीर्याने घेत नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. असेच एकेक नेता करीत गेला तर उद्धव ठाकरे यांचे राजकीय महत्त्व संपून जाईल. राजकारणात बोलत राहावे लागते हे खरे आहे. पण, काहीही बोलत राहिलात तर गांभीर्य संपते आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ लागते. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या प्रतिपादनांमध्ये काही नवे आणले नाही तर त्यांची गत तशी होऊ शकते. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात फिरावे लागेल. लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. लोकांमध्ये मिसळावे लागेल. दरबारी राजकारण सोडून सामान्यांसाठी समाजकारण करण्याचा वसा घ्यावा लागेल. त्यांना राजकीय घराण्याचा वारसा आहे. मात्र, राजकारण त्यांनी यापूर्वी कधीही केलेले नाही. Depression साधा नगरसेवकपदाचा अनुभव नव्हता तरीही ते मुख्यमंत्री झाले. त्यांना कर्तृत्व बजावण्याची संधी होती. त्यात ते चुकले. अखंड शिवसेनेत फूट पडली आणि ते सत्ता गमावून बसले.
आता ते नुसते Depression बोलत सुटले आहेत. शेलक्या विशेषणांचा अकाली पाऊस पाडत आहेत. यातून त्यांच्या पक्षाचे काही भले होण्याची शक्यता नाही. त्यांची स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात अनंत प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखे अनेक गंभीर विषय आहेत. आरोग्य व शिक्षणाशी संबंधित असंख्य विषय आहेत. त्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला तर त्यांच्या विरोधक असण्याला अर्थ प्राप्त होईल. त्यांच्या प्रतिपादनांना धार मिळेल. पण, त्यासाठी त्यांना हे सारे प्रश्न मुळातून अभ्यासावे लागतील. अभ्यास नसेल तर बोलू नये आणि काम नसेल तर केवळ तत्त्वज्ञान सांगू नये. उद्धवजींनी भाजपाच्या नावाने कितीही शिमगा Depression केला तरी आज भाजपा हा राष्ट्रीय आणि शक्तिशाली पक्ष आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. तरीही उद्धवजी केवळ भाजपाविरोध करून स्वत:च्या पक्षाचा उद्धार करू पाहत असतील तर ते चुकत आहेत. दिवा विझताना फार फडफडतो असे म्हणतात. तसे तर शिल्लक सेनेच्या बाबतीत घडणार नाही ना, अशी शंका उद्धवजींच्या निराशेने Depression भरलेल्या भाषणांमुळे येऊ लागली आहे. तसे घडायचे नसेल तर त्यांनी एक विचार लक्षात ठेवावा- दिव्याने प्रकाश व्हावे, पण प्रकाशाचा द्वेष करू नये.