बनारसी स्टाइल बटाट्याची भाजी रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २१ मार्च २०२३। बनारसी स्टाइल बटाट्याची भाजी ही झटपट तयार होणारी एक स्वादिष्ट पदार्थ आहे. बटाटे आणि जि-यांचा वापर करुन बनवली जाणारा हा पदार्थ अत्यंत आकर्षक व स्वादिष्ट असते. हा पदार्थ कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
5 मध्यम चिरलेले बटाटा, 2 चमचे जिऱ्याच्या बिया, 1.2 चमचे धणे, 1 कप कोथिंबीरीची पाने, 1 चमचे तूप, 1.2 चमचे सुक्या आंब्याची पावडर, 1 चमचे रेड चिली पावडर आवश्यकतेनुसार पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी

कृती 
सर्वप्रथम एका पॅनमध्ये जिरे गोल्डन-ब्राऊन रंगाचे होईपर्यंत चांगले भाजून घ्या. त्याचप्रमाणे धणे देखील भाजून घ्या. पुढे, भाजलेल्या धण्या-जि-यांची कुटून बारीक पावडर करा. ४ ते ५ मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये घालून ५ ते ६ शिट्ट्या देऊन शिजवा. बटाटे चांगले शिजल्यानंतर त्याच्या साली काढून ते चौकोनी आकारात कापून घ्या. एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात जिरे, बारीक चिरलेले बटाटे, कुटलेल्या धण्या-जि-याची पावडर, १ चमचा लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ आणि १ चमचा आमचूर पावडर घाला आणि सर्व सामग्री ४ ते ५ मिनिटे परतून घ्या. तयार झाली आहे आपली खमंग व चमचमीत बनारसी स्टाइल बटाट्याची भाजी.