---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : नोकरीचे अमिष दाखवून बांग्लादेशी तरुणीला देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून बांग्लादेशी तरुणीसह देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित पुजा आत्माराम जाधव (वय २७, रा. प्रोफेसर कॉलनी) या महिलेला ताब्यात घेतले आहे.
जळगावातील प्रोफेसर कॉलनीत एका बांग्लादेशी महिलेला डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती पुणे येथील फ्रिडम फर्म या संस्थेला मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेवून माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
---Advertisement---
त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावकारे यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोहेका भारती देशमुख हे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रोफेसर कॉलनीत थडकले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, एका खोलीत बांग्लादेशी तरुणी मिळून आली.
बांग्लादेशी तरुणीकडे तिच्या आयडी कार्डची झेरॉक्स मिळून आली. चौकशी दरम्यान तिने दि. २३ रोजी नाशिक रेल्वे स्टेशनवर पुजा जाधव हिची भेट झाली. तसेच पैसे घेवून देहविक्री करण्यास सांगितले. तिला नकार दिला असता, तिने शिवीगाळ केल्याचे सांगितले.
पीडित तरुणीला जळगावात आणून डांबून ठेवत तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेणाऱ्या पुजा आत्माराम जाधव या महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.