Bank Job 2025: जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, एकूण ४०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. तसेच, नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये ठेवण्यात आला आहे.
एससी,एसटी,पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये ठेवण्यात आला आहे.
वेतन किती ?
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या या पदांसाठी कोणत्याही उमेदवाराची निवड झाल्यास त्याला ८५९२० रुपये पगार दिला जाईल. याशिवाय, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA)/, शहर भरपाई भत्ता (CCA) आणि इतर सुविधा नियमांनुसार दिल्या जातील.
उमेदवार IOB च्या अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख ३१ मे २०२५ ठेवण्यात आली आहे.