बँकेत नोकरीची संधी, दरमहा ३६ हजार पगार

तरुण भारत लाईव्ह । १९ फेब्रुवारी २०२३। चांगलं शिक्षण झालं म्हणजे चांगली नोकरी ही हवीच. नोकरीसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. मात्र त्यात काही जणच यशस्वी होतात तर काही जणांना प्रायव्हेट नोकरीवर समाधानीव्हावं लागत. आता अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी चालून आली आहे.  इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे IDBI बँकेत काही पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 आहे.

यामध्ये एकूण ६०० पदांची भरती होणार असून, असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती आहे. उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. तसेच बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात 02 वर्षे अनुभव आवश्यक असून, 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे. तसेच नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असणार आहे.

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹200/-]
वेतनश्रेणी : मूळ वेतन 36000-1490(7)-46430-1740(2)-49910-1990(7)-63840(17 वर्षे) या वेतनश्रेणी अंतर्गत सुरुवातीला रु.36,000/- दरमहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023