तरुण भारत लाईव्ह ।०८ फेब्रुवारी २०२३। शेजारचा पाकिस्तान दिवाळखोर Bankrrupt Pakistan झाला आहे. तिथे अन्नाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाचाही तुटवडा आहे. सामान्य पाकिस्तानी जनता हैराण झाली आहे. अन्नान्न दशा कशाला म्हणतात, त्याचा अनुभव तिथले लोक घेत आहेत. असे असतानाही पाकिस्तानातील कट्टरवादी संघटना, तिथल्या अतिरेकी संघटना, लष्कर आणि राजकीय नेते मात्र काश्मीरचाच राग आळवताना दिसताहेत. Bankrrupt Pakistan काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भोळ्याभाबड्या वा येड्या जनतेला साद घालायची आणि भारताविरुद्ध चिथावणी देऊन मूळ समस्येवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवायचे, हा उद्योग तिथे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. Bankrrupt Pakistan कालपरवाच पाकिस्तानात सर्व कट्टरवाद्यांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला. भारतीय काश्मिरात राहणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. Bankrrupt Pakistan व्याप्त काश्मिरातील लोक भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करीत असताना पाकिस्तानी कट्टरपंथी भारतीय काश्मिरातील जनतेवरील अत्याचाराविरोधात बोलताहेत, हे निव्वळ हास्यास्पद आहे.
दिवाळखोर पाकिस्तान, बेजबाबदार नेते…!
Bankrrupt Pakistan जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत, मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, लोक गाशा गुंडाळून देश सोडून जाण्याची भाषा करत आहेत आणि त्याचवेळी लष्करातील ‘नापाक’ अधिकारी, सपशेल अपयशी ठरलेले भ्रष्ट राजकीय नेते, धार्मिक कट्टरपंथी मात्र काश्मीरचा मुद्दा उकरून काढत आपल्या दुष्कृत्यांवर, भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. Bankrrupt Pakistan ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ कशाला म्हणतात, याची प्रचीती पाकिस्तानी नेत्यांच्या वर्तणुकीतून येते आहे. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि राजकीय नेते देशाच्या दुर्गतीकडे दुर्लक्ष करीत आहेत. Bankrrupt Pakistan प्रत्येक आघाडीवर देश रसातळाला गेला असताना, त्याची कारणे शोधून उपाय करायचे, जनतेला दिलासा द्यायचा सोडून जुन्या धोरणांवरच ते कायम आहेत. भारत प्रजासत्ताक देश बनला, त्याला नुकतीच ७३ वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने भारताने आपल्या जनतेला वेगवान प्रगतीबाबत आश्वस्त केले असतानाच पाकिस्तानची आर्थिक स्थिती मात्र प्रचंड खालावली आहे. Bankrrupt Pakistan एकाच दिवशी अस्तित्वात येऊनही पाकिस्तान भिकारी देश बनला आहे, तर भारत जगातली पाचवी अर्थव्यवस्था बनून गौरवाने मिरवितो आहे.
देश निराशेच्या खोल गर्तेत अडकला आहे आणि दिवाळखोरीला कंटाळून लोक देश सोडून जाण्याची भाषा करत आहेत, अशा आशयाचा मजकूर ‘डॉन’ या तिथल्या इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केला आहे. Bankrrupt Pakistan यावरून पाकिस्तानात किती भीषण परिस्थिती आहे, याची कल्पना आपल्याला सहज यावी. देशातील गरिबी दूर करण्यासाठी काय करता येईल, यावर चिंतन-मनन करण्याऐवजी नेते जुन्याच ध्येयधोरणांचा राग आळवणार असतील तर तेथील जनतेला कुणीही वाचवू शकणार नाही, हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही? Bankrrupt Pakistan जनतेनेच आता लष्कर आणि राजकीय नेते यांच्याविरुद्ध उठाव करण्याची वेळ आली आहे. लष्कर, राजकारणी आणि मुल्ला-मौलवी यांनी जी धोरणे अवलंबली आहेत ना, ती पाकिस्तानला पाषाण युगात नेणारी आहेत, हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे. Bankrrupt Pakistan आपल्याच सोबत अस्तित्वात आलेल्या भारताची किती प्रगती झाली, ती कशी झाली, भारतीय जनतेला कशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध होतात, याचा अभ्यास करून स्वत:च्या देशात सरकारवर दबाव निर्माण करण्याची क्षमता पाकिस्तानी जनता स्वत:मध्ये निर्माण करीत नाही, तोपर्यंत तिथल्या लोकांना कुणीही तारू शकणार नाही.
Bankrrupt Pakistan संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईने मदत केली नसती तर पाकिस्तान कधीचाच कंगाल झाला असता. सध्या पाकिस्तानी स्टेट बँकेकडे केवळ एक महिन्याच्या निर्यातीची वित्तीय व्यवस्था करण्याची क्षमता उरली आहे. पाकिस्तानी रुपयाची दयनीय स्थिती झाली आहे. रुपयाला सावरण्यासाठी पाकिस्तानला तत्काळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीची अपेक्षा आहे. नाणेनिधी मदत करायला तयार आहे. Bankrrupt Pakistan परंतु, मदतीआधी काही अटी पाकिस्तानपुढे ठेवल्या आहेत. सरकारने सबसिडीवरील खर्च कमी करावा अर्थात सवलती कमी कराव्यात, करसंग्रह वाढवावा आणि इंधनाच्या व विजेच्या दरात वाढ करावी, या काही प्रमुख अटी आहेत. या अटी पाकिस्तानने मान्य केल्या तर सत्तेत असलेल्या शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारची लोकप्रियता कमी होईल, थोडक्यात हे सरकारच अलोकप्रिय होईल. Bankrrupt Pakistan याची प्रचीती पाकिस्तानी पंजाबात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये शरीफ यांच्या पक्षाला आलीच. या पोटनिवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ अर्थात पीटीआय या पक्षाला यश मिळाले.
नाणेनिधीच्या अटी मंजूर केल्या तर देशात असेच राजकीय अपयश येऊ शकते, याची जाणीव शहबाज शरीफ यांना त्यांचे बंधू व माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी करवून दिल्याने शहबाज यांनी नाणेनिधीच्या अटी लगोलग मान्य केलेल्या नाहीत. Bankrrupt Pakistan त्याच्याच परिणामी नाणेनिधीनेही मदत थांबविली. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लोक देश सोडून जाण्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे शहबाज शरीफ यांनी नाणेनिधीला अटींच्या पालनाबाबत आश्वस्त केले आहे. दिवाळखोरीच्या खाईत गेलेल्या पाकिस्तानात शहबाज शरीफ जनसमर्थन गमावण्याच्या स्थितीत आले असतानाच इम्रान खान यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. Bankrrupt Pakistan आर्थिक संकटात ते संधी शोधताना दिसताहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीसाठी निवडणुका होणारच आहेत. पण, त्या मुदतपूर्व व्हाव्यात, यासाठी इम्रान खान प्रयत्नशील दिसत आहेत. Bankrrupt Pakistan देश संकटात सापडला असताना सगळे मिळून जनतेला दिलासा कसा देता येईल, हे पाहायचे सोडून नेते राजकारणावरच भर देत आहेत, हे तेथील जनतेचे दुर्भाग्यच!
Bankrrupt Pakistan सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्याच्या प्रयत्नात यश मिळावे यासाठी इम्रान खान यांनी पंजाब आणि खैबर पख्तुनवा या प्रांतांमधील सरकारे बरखास्त केली आहेत. तिथे काळजीवाहू सरकारे नेमण्यात आली आहेत. एप्रिलच्या शेवटपर्यंत या दोन्ही प्रांतांमध्ये निवडणुका होतील आणि आपणच त्या जिंकू, असा इम्रान खान यांचा कयास आहे. Bankrrupt Pakistan पाकिस्तानात कणकेचा मोठा तुटवडा आहे. टमाटर प्रचंड महाग आहेत. भाजीपाला आवाक्याबाहेर गेला आहे. ग्राहकांची क्रयशक्ती संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागलेल्या आहेत. कारण, इंधनाचाही प्रचंड तुटवडा आहे. असे असतानाही राजकीय नेते त्यांचा स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. Bankrrupt Pakistan मुल्ला-मौलवी जनतेला कट्टरवादाचे धडे देण्यात गुंतले आहेत. Bankrrupt Pakistan लष्कर आणि आयएसआयकडून अतिरेक्यांना प्रशिक्षित करून भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी पाठविले जात आहे. प्रत्यक्ष युद्धात कधीही भारतापुढे टिकाव धरू न शकणाऱ्या पाकिस्तानने फार आधीपासून छुपे युद्ध पुकारले आहे. Bankrrupt Pakistan गेल्या दोन-तीन वर्षांत भारताच्या शूर जवानांनी असंख्य अतिरेक्यांना टिपल्यानंतरही पाकिस्तान सुधरायला तयार नाही.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने पाकला अनेक वेळा चारीमुंड्या चीत केले आहे. Bankrrupt Pakistan सुंभ जळाला असला तरी पाकिस्तानचा पीळ मात्र कायम आहे. पाकिस्तानातली सगळीच जनता भारतविरोधी आहे वा भोळीभाबडी आहे, असे नाही. तिथे जशी धार्मिक कट्टरता पाळणारी तरुणाई आहे, तशीच समंजस तरुण पिढीही आहे, जिला आपले हित कशात आहे, हे चांगले ठाऊक आहे. Bankrrupt Pakistan भारताची झालेली प्रगती त्यांना त्यांच्या नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणाची जाणीव करून देत आहे. भारताने ७५ वर्षांमध्ये जर एवढी प्रचंड प्रगती केली तर आपण का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांची दमछाक होतानाही दिसते आहे. Bankrrupt Pakistan शिक्षण-प्रशिक्षणाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीबाबत तर अनेक तरुण भारताची प्रशंसा करताना थकत नाहीत. विदेशात पाकिस्तानी नागरिकांना जो अपमान सहन करावा लागतो, त्याबाबतही ते खंत व्यक्त करताना दिसतात.
Bankrrupt Pakistan याउलट, भारताला जी प्रतिष्ठा मिळते आहे, त्याची तोंडभरून प्रशंसाही ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दृष्टीने शत्रू आहेत, ही भावना मनात असतानाही भारताला त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, त्याबाबतीतही पाकिस्तानी तरुणाई बोलताना दिसते आणि आपल्याकडे मोदींसारखा नेता का नाही, याबाबत खंतही व्यक्त करते. Bankrrupt Pakistan मोदींच्या नेतृत्वात भारताने जी प्रगती केली आहे, प्रतिष्ठा प्राप्त केली आहे, त्याची चर्चा पाकिस्तानमध्ये होत असते. पण, जेव्हा काश्मीरचा विषय निघतो तेव्हा या सगळ्या चर्चांना विराम मिळतो आणि भारतद्वेष उफाळून येतो, हे वास्तव आहे. Bankrrupt Pakistan असेच जर होत राहिले तर पाकिस्तान कधीही प्रगती करणार नाही आणि नजीकच्या भविष्यात श्रीलंकेपेक्षाही वाईट अवस्थेचा सामना त्या देशाला, तिथल्या जनतेला करावा लागेल व यासाठी सर्वस्वी जनताच जबाबदार असेल, यात शंका नाही.