---Advertisement---
Bank Holiday : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्यात सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. त्यानुसार बँकेने या महिन्यातील यादी जाहीर केली असून, उद्यापासून चार दिवस देशातील विविध बँकांना सुट्टी असणार आहे. तुम्हाला बँकांशी संबंधित काही महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर, आधी ही यादी चेक करून घ्या.
या आठवड्यातील पहिली सुट्टी २५ ऑगस्ट म्हणजेच सोमवारी आहे. या दिवशी गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्टी असेल, श्रीमंत शंकरदेव गायब दिनानिमित्त बँका बंद राहतील. मात्र, इतर राज्यात बँका चालू राहतील.
बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीमुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये मुंबई, बेलापूर, नागपूर, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, विजयवाडा आणि पणजी यांचा समावेश आहे. इतर शहरांमध्ये बँका सामान्यपणे खुल्या राहतील. याशिवाय गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी भुवनेश्वर आणि पणजीमध्ये बँका बंद राहतील, इतर शहरांमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध असतील.
दुसरीकडे, ३१ ऑगस्ट रोजी रविवार आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, देशातील सर्व बँका रविवारी बंद आहेत. परंतु , ज्या दिवशी बँका बंद राहतील, त्या दिवशी ऑनलाइन माध्यमातून काम केले जाईल.
ऑनलाइन पैसे काढू शकाल
आठवड्यातून चार दिवस बँका बंद असल्या, तरी तुम्ही ऑनलाइन नेटबँकिंगद्वारे पेमेंट करू शकाल. एटीएम, ऑनलाइन बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा उपलब्ध असतील. ज्यांच्याकडे बँकेत रोख रक्कम असणे वा कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे जमा करणे किंवा घेणे आवश्यक आहे त्यांनाच यामुळे अडचणी येऊ शकतात.