---Advertisement---

नागरिकांनो लक्ष द्या ! सलग तीन दिवस बंद राहणार बँका, महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा

---Advertisement---

Bank holiday : सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अर्थात कर्ज मंजुरी, चेक क्लिअरन्स आणि इतर शाखांशी संबंधित सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे काही महत्वाची कामे असल्यास ती आजच पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज २७ जून रोजी ओरिसाच्या जगन्नाथ मंदिरात रथयात्रा काढली जाणार आहे. यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये २७ जून रोजी बँका बंद राहतील. रथयात्रा हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे, त्यानंतर २८ जून रोजी चौथा शनिवार आणि २९ जून (रविवार) रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. त्यामुळे शनिवार आणि रविवारी देशभरातील बँका बंद राहतील.

सलग तीन दिवस बँक बंद असल्याने ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अर्थात कर्ज मंजुरी, चेक क्लिअरन्स आणि इतर शाखांशी संबंधित सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत ग्राहकांनी डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करावा आणि आवश्यक बँकिंग कामे आगाऊ करावीत, असा सल्ला देण्यात येत आहे.

२७ जून २०२५ रोजी ओडिशा आणि मणिपूरमध्ये रथयात्रेमुळे बँका बंद राहतील. उर्वरित राज्यांमध्ये, हा दिवस सामान्य कामकाजाचा दिवस असेल आणि तेथे बँका खुल्या राहतील. याशिवाय, ३० जून रोजी मिझोरममध्ये रमणानी किंवा शांती दिनानिमित्त बँका बंद राहतील.

रथयात्रा म्हणजे काय?

हिंदू धर्मातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा रथ उत्सव मानला जातो. हा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यात (जून-जुलै) साजरा केला जातो. हा उत्सव ओडिशातील पुरी शहरात होतो आणि तो भगवान जगन्नाथ (ज्यांना विष्णू किंवा कृष्णाचा अवतार मानले जाते) यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी, भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना मोठ्या रथात शहराभोवती फिरवले जाते. या परंपरेला लाखो भाविक आकर्षित करतात आणि देश-विदेशातील लोक त्यात सहभागी होत असतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---