नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात तुमची बँकेची कुठली महत्त्वाची कामे असतील तर लवकर आटोपून घ्या, कारण डिसेंबर महिन्यात बँका १३ दिवस बंद राहणार आहेत. नव्या वर्षाचे स्वागत, ख्रिसमस तसेच इतर काही निमित्ताने डिसेंबर महिन्यात बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही एखादे दिवस बँकेत गेलात आणि बँक बंद असेल तर मोठी अडचण येऊ शकते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यासाठी बँक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून मिळून एकूण १३ दिवस बँका बंद असलीत. बँकांचे सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहिल्यास विविध राज्ये आणि शहरांमध्ये ३, १२, १९, २४, २६, २९, ३०, ३१ या तारखांना बँकांना सुट्टी असेल. तर ४, १०, ११, २४, २५ डिसेंबर रोजी बँकांना रविवारची, साप्ताहिक सुट्टी असेल. दरम्यान, नाताळही रविवारी आला आहे.